कृषी आत्महत्यांचे वर्गीकरण प्रथमच आमदारांचाही सहभाग

By admin | Published: June 7, 2014 12:28 AM2014-06-07T00:28:41+5:302014-06-07T00:28:41+5:30

आव्हानांना सर्मथपने तोंड देत आणि संकटाचे संधीत रुपांतर करणारा व शेतकर्‍यांना कृतिशील दिलासा देणारा

For the first time, the participation of the MLAs was also classified as the category of farm suicides | कृषी आत्महत्यांचे वर्गीकरण प्रथमच आमदारांचाही सहभाग

कृषी आत्महत्यांचे वर्गीकरण प्रथमच आमदारांचाही सहभाग

Next

३७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित : १0 महिन्यांनी जिल्हा प्रशासनाला जाग
गजानन मोहोड  अमरावती

आव्हानांना सर्मथपने तोंड देत आणि संकटाचे संधीत रुपांतर करणारा व शेतकर्‍यांना कृतिशील दिलासा देणारा पथदश्री कार्यक्रम अमरावती विभागात  शासनाने मागील आठ वर्षांपासून राबविला. परंतु सततची नैसर्गिक आपत्ती यामुळे होणारे कार्य यामध्ये जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे वाढते  प्रमाण आहे.
सन २0१३-१४ मध्ये ७९ शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्यात या प्रकरणांची छाननी करणार्‍या जिल्हास्तर समितीमध्ये स्थानिक आमदारांचा समावेश  करण्याचे पत्र महसूल विभागाच्या उपसचिवांनी ६ ऑगस्ट २0१३ रोजी दिले. यानंतर ही जिल्हास्तर समितीच्या बैठकी झाल्यात मात्र यामध्ये  आमदारांचा समावेश नव्हता १0 महिन्यानंतर जिल्हा प्रशासनाला अखेर जाग आली.
११ जून २0१४ च्या सभेत स्थानिक आमदारांचा समावेश करण्यात आला आहे.  शेतकरी आत्महत्या प्रकरणांची छाननी करणार्‍या शासकीय व  अशासकीय सदस्यांचा शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येते.
शेतकरी पॅकेज समितीमध्ये आमदार सहभागाची सूचना
मागील पाच वर्षांपूर्वी शेतकरी आत्महत्यापैकी ७५ टक्के आत्महत्या अमरावती विभागातील पाच जिल्हे व वर्धा जिल्ह्यातील होत्या. या प्रकरणांची  तत्काळ चौकशी व बाधित कुटुंबाला त्वरित मदत मिळण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी, शेतकर्‍यांचे प्रतिनिधी संबंधित  अधिकारी व सेवाभावी प्रतिनिधींची समिती गठित करण्याचे शासनाचे आदेश होते.
शेतकर्‍यांपर्यंत लाभ पोहोचत नाही
जानेवारी ते डिसेंबर २0१४ दरम्यान जिल्ह्यात ७९ शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी होणारी नापिकी यामुळे  शेतकरी आर्थिक संकटात आहे. शेतीपूरक व्यवसायासाठी असणार्‍या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचत नाही, गारपीटग्रस्तांना शासनाने दिलेली  आर्थिक मदत अद्याप त्यांच्या बँक खात्यात वर्ग नाही. नैसर्गिक आपत्ती असताना पीक विमा मिळत नाही. यामुळे खचलेल्या मानसीकतेमधून शेतकरी  आत्महत्यांचे प्रकारात पुन्हा वाढ होत आहे.

Web Title: For the first time, the participation of the MLAs was also classified as the category of farm suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.