पहिली लाट ज्येष्ठांच्या, दुसरी रुग्णांच्या जिवावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:09 AM2021-06-05T04:09:57+5:302021-06-05T04:09:57+5:30
अमरावती : गतवर्षी मार्चपासून ठाण मांडून बसलेल्या कोरोनाने आतापर्यंत १,४७७ जणांचे बळी घेतले. यात महिलांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक आहे. ...
अमरावती : गतवर्षी मार्चपासून ठाण मांडून बसलेल्या कोरोनाने आतापर्यंत १,४७७ जणांचे बळी घेतले. यात महिलांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक आहे. पहिल्या लाटेत मोठी दहशत होती. मात्र, मृत्युदर नियंत्रणात होता. मार्च २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ दरम्यान पहिल्या लाटेत तरुणांना सर्वात जास्त लागण झाली. कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीपासून सुरू झाली. अनेकांना ऑक्सिजन, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यूचा सामना करावा लागला. पहिल्या, दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट अतिशय धाेकादायक असेल, असे संकेत आरोग्य यंत्रणेने दिले आहे. त्याअनुषंगाने बालकांची काळजी घेण्याच्या अनुषंगाने आतापासूनच उपाययोजना राबविल्या जात आहे. लहान बालकांसाठी अत्यावश्यक सुविधांसाठीचे हॉस्पिटल साकारले जात आहेत.
-----------------------------
काेरोना मृत्यू
काय म्हणते आकडेवारी?
वयोगट पहिली लाट दुसरी लाट
१ ते १५ : --------------०४
१६ ते ३० :----------- ९१
३१ ते ४५ :---------------३६०
४६ ते ६० :--------------१९९
६१ ते ७५:---------------- ५३५
७६ ते ९०:-------------२२८
---------------
महिला
पॉझिटिव्ह : ४२२३१
बळी: ४६७
--------------------------
कोरोना पॉझिटिव्ह (वयोगटानुसार) पहिली लाट / दुसरी लाट
० ते १५ : १५०४/ ९०८
१६ ते ३०: २६८९/ ३२४४
३१ ते ४५: ६७८५/ ७२७८
------------
४६ ते ६०: ८४५३/ ९८५४
६१ ते ७५: ५४२३/३१८९
७६ ते ९० : २४२१/१२९०
९१ ते पुढे : २१५४/१४३२
---------------
कोट
पहिल्या लाटेत झालेल्या चुकांमुळे दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला. याची दक्षता घेण्यात आली असून, तिसऱ्या लाटेबाबत उणिवा राहू नये, याकरिता नियोजन चालविले आहे. लहान मुलांसाठी इर्विन, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र वार्ड निर्माण करण्यात आला आहे.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक, अमरावती
-----------------
तिसरी लाट?
- येत्या ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे.
- जिल्हा सामान्य रूग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बालकांसाठी स्वंतत्र रुग्णालय साकारले जाणार आहे.
- गत काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेत बालरोग तज्ज्ञांची बैठक घेण्यात आली असून, यात नियोजनावर भर देण्यात आला.