बडनेऱ्यात २५ कोटींतून साकारणार अद्ययावत ‘फिश हब’

By admin | Published: February 7, 2015 11:14 PM2015-02-07T23:14:37+5:302015-02-07T23:14:37+5:30

महापालिका प्रशासनाने बडनेरा शहरात ‘फिश हब’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता २५ कोटी रुपये खर्च होणार असून पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे.

'Fish Hub' to be built in Badenrea by 25 crores | बडनेऱ्यात २५ कोटींतून साकारणार अद्ययावत ‘फिश हब’

बडनेऱ्यात २५ कोटींतून साकारणार अद्ययावत ‘फिश हब’

Next

गणेश वासनिक - अमरावती
महापालिका प्रशासनाने बडनेरा शहरात ‘फिश हब’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता २५ कोटी रुपये खर्च होणार असून पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या अनुदानातून ‘फिश हब’ हा प्रकल्प साकारल्या जाणार आहे. मुंबई, कोकणच्या धर्तीवर हा हब निर्माण केला जाणार आहे. अद्ययावत प्रणालीचा हब तयार करण्यासाठी प्रस्ताव महापालिकेला तयार करावा लागणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल. ६० टक्के अनुदान केंद्र शासन तर ४० टक्के निधी महापालिकेला उभारावा लागणार आहे.
मत्स्य व्यवसायातून रोजगाराला वाव
विदर्भात मत्स्य व्यवसायाने गती घेतली आहे. मात्र मुंबई, कोकणच्या तुलनेत मासे साठवून ठेवण्यासाठी अद्ययावत सोयसुविधा नाही. बडनेऱ्यात साकारल्या जाणाऱ्या ‘फिश हब’च्या माध्यमातून मत्स्य व्यवसायाला वाव मिळेल. या हबमध्ये अद्ययावत शीतगृह, मासे साठवणुकीची व्यवस्था, बर्फ तयार करण्याचे यंत्र निर्माण केले जाणार आहे.

Web Title: 'Fish Hub' to be built in Badenrea by 25 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.