मासे पकडणे बेतले त्याच्या जीवावर.. प्रवाहाने त्याला ओढून नेले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 01:33 PM2020-07-16T13:33:28+5:302020-07-16T13:34:29+5:30

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेलू नटवा येथील ३५ वर्षीय युवक बेंबळा नदीच्या पात्रात बुधवारी वाहून गेला. त्याचा अद्याप शोध लागलेला नाही.

Fishing takes away his life .. The current dragged him away .. | मासे पकडणे बेतले त्याच्या जीवावर.. प्रवाहाने त्याला ओढून नेले..

मासे पकडणे बेतले त्याच्या जीवावर.. प्रवाहाने त्याला ओढून नेले..

Next
ठळक मुद्देशोध सुरूतहसीलदार, ठाणेदार घटनास्थळी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेलू नटवा येथील ३५ वर्षीय युवक बेंबळा नदीच्या पात्रात बुधवारी वाहून गेला. त्याचा अद्याप शोध लागलेला नाही.
तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण आहे. बेंबळा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे मासे पकडण्यासाठी शेलू नटवा येथील नितीन गणपतराव शेंडे (३५) हा युवक बेंबळा नदीवर गेला होता. बुधवारी दुपारी २ च्या सुमारास मासोळ्या पकडत असताना नदीच्या जोरदार प्रवाहात तो वाहत गेला.

ही घटना कळताच तहसीलदार पीयूष चिवंडे, नायब तहसीलदार चेतन मोरे, ठाणेदार उदय सोयस्कर व पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस उपनिरीक्षक ओंकार सोळंके, चंद्रकांत कोष्टी, विनोद कुरळकर, प्रशांत बेलोकार, विवेक ठाकरे, सचिन मसांगे, सदाशिव देवकाते या पोलीस कर्मचाऱ्यांनी सायंकाळी अंधार पडण्यापर्यंत गावकऱ्यांच्या मदतीने शोधकार्य सुरू ठेवले. पण, त्याचा शोध लागला नाही. गुरुवारी सकाळी पुन्हा शोध घेतला जाणार असल्याचे ठाणेदारांनी सांगितले.

Web Title: Fishing takes away his life .. The current dragged him away ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.