तिवसा शहरात वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी पाच कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:14 AM2021-05-07T04:14:24+5:302021-05-07T04:14:24+5:30

अमरावती : जिल्ह्यातील तिवसा शहरात विविध वैशिष्ट्यपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत नगरविकास विभागाकडून पाच कोटी रुपये निधी ...

Five crore for special works in Tivasa city | तिवसा शहरात वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी पाच कोटी

तिवसा शहरात वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी पाच कोटी

Next

अमरावती : जिल्ह्यातील तिवसा शहरात विविध वैशिष्ट्यपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत नगरविकास विभागाकडून पाच कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे नागरी सुविधांच्या महत्त्वपूर्ण कामांना चालना मिळणार असून, जिल्ह्यातील इतरही शहरांसाठी लवकरच निधी मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी दिली.

जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामे आकारास यावीत, यासाठी पुरेसा निधी प्राप्त होण्यासाठी पालकमंत्री ठाकूर यांच्याकडून शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा होत आहे. त्यानुसार तिवसा नगरपंचायतीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, सिमेंट रस्ता, नाली बांधणे, सौंदर्यीकरण, हायमास्ट पथदिवे, रस्त्याचे काँक्रिटीकरण, लादीकरण आदी कामे त्यातून पूर्ण होणार आहेत.

शहरातील सर्व परिसराचा विचार करून सर्व ठिकाणी पायाभूत सुविधांसह वैशिष्ट्यपूर्ण कामांना या निधीतून चालना मिळणार आहे व शहराचा सर्वसमावेशक विकास साधला जाणार आहे. जिल्ह्यातील इतर शहरांसाठी विशेष अनुदान योजनेत वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी लवकरात लवकर निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री ठाकूर यांनी दिली.

तिवसा शहरात प्रभाग दोनमधील सिमेंट रस्ता, प्रभाग १३ मध्ये दोन नाल्यांचे बांधकाम या कामांसाठी २२ लक्ष रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक १३ मध्ये सुरेश मोरघडे ते ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या घरासमोरील नालीचे बांधकामासाठी १० लक्ष, तसेच भीमराव मेश्राम ते मधुकर खंगार यांच्या घरासमोरील नालीचे बांधकामासाठी १० लक्ष, समर्थगेट गीर महाराज मंदिर परिसरात स्वयंपाकगृह बांधकामासाठी १३ लक्ष, प्रभाग क्रमांक १५ मधील सिमेंट रस्त्यासाठी १० लक्ष, माणिकविहार येथील राजेंद्र वानखडे ते धनराज ठाकरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकामासाठी १० लक्ष निधी वितरित करण्यात आला आहे.

प्रभाग क्रमांक ९ मध्ये हायमास्ट पथदिवे, प्रभाग क्र. १२ मध्ये नाल्याचा उतार काढणे, प्रभाग एकमध्ये कब्रस्तानात काँक्रिट रस्ता करणे यासाठी १३ लक्ष, प्रभाग तीनमध्ये काँक्रिट नालीसाठी १५ लक्ष, प्रभाग ५ मध्ये रोडसाईड लादीकरणासाठी व काँक्रिट रस्त्यासाठी १२ लक्ष, प्रभाग १४ मध्ये काँक्रिट रस्त्यासाठी १० लक्ष, प्रभाग १५ व १६ मध्ये काँक्रिट रस्त्यासाठी १७ लक्ष, प्रभाग १३ मध्ये लादीकरणासाठी १० लक्ष व जुनी ग्रामपंचायत ते नदीपर्यंत काँक्रिट नालीसाठी १० लक्ष देण्यात येणार आहे.

Web Title: Five crore for special works in Tivasa city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.