बाजार समितीत पाच संचालक अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:15 AM2021-07-14T04:15:44+5:302021-07-14T04:15:44+5:30

अमरावती बाजार समितीत १७ संचालकांची बॉडी आहे. नुकतेच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत समितीमधील एक संचालक पराभूत झाले आहेत. एका ...

Five directors disqualified from the market committee | बाजार समितीत पाच संचालक अपात्र

बाजार समितीत पाच संचालक अपात्र

Next

अमरावती बाजार समितीत १७ संचालकांची बॉडी आहे. नुकतेच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत समितीमधील एक संचालक पराभूत झाले आहेत. एका संचालकाने ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर केलेला नव्हता. तरीही बाजार समितीच्या कायद्यानुसार बाजार समितीत उमेदवारी अबाधित ठेवण्याकरिता ग्रामपंचायत व सेवा सहकारी संस्थेत सदस्यत्व असणे बंधनकारक आहे. जर ग्रामपंचायत व सेवा सहकारी संस्थेत सदस्यत्व नसल्यास बाजार समितीवर संचालक म्हणून नियमानुसार अपात्र ठरते. असे असताना स्थानिक कृषिउन्पन्न बाजार समितीत पाच संचालक अवैधरीत्या कोट्यवधींच्या बांधकामाचे धोरणात्मक निर्णय घेत आहेत.

एका संचालकाने नुकतीच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव पत्करले असून, अन्य एका संचालकाने निवडणुकीत भाग घेतलेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही संचालकांचे समितीवरील पद अपात्र ठरले.

सद्यस्थितीत जिल्हा बँकेची निवडणूक रंगात येत असून या बँकेवर सभासदत्व मिळविण्याकरिता सेवा सहकारी संस्थेतून समितीवर कार्यरत असलेल्या एकूण तीन संचालकांनी सेवा सहकारी संस्थेचे राजीनामे दिलेले आहेत. तरीसुद्धा हे पाचही संचालक समितीवर अवैध कार्यरत असून समिती संचालक मंडळाच्या सभेत कोट्यवधी रुपयांचे धोरणात्मक निर्णय घेत आहे. याकडे सहकार विभाग डोळेझाक करीत आहे. आता सहकार विभाग या प्रकरणात काय कारवाई करते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बॉक्स

डीडीआरकडे तक्रार

बाजार समितीत संचालक पदावर असलेल्या एकाचा ग्रामपंचायत निवडणुकीत परावभव झाल्याने त्यांचे संचालकपद रद्द व्हावे, यासाठी सेवा सहकारी सोसायटीतील विरोधी सदस्यांनी डीडीआर संदीप जाधव यांच्याकडे तक्रारदेखील दिलेली आहे. त्यावर लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती आहे.

कोट

सभापती, उपसभापती मिळून १८ संचालकांची बॉडी येथे आहे. संचालकांची मासिक सभा बुधवार, १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. संचालकांच्या पात्र, अपात्रतेची व्याख्या मी सभापती म्हणून करून शकत नाही.

- अशोक दहीकर, सभापती, कृषिउत्पन्न बाजार समिती

Web Title: Five directors disqualified from the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.