पाच कर्मचारी निलंबित, एक कंत्राटी बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:23 PM2018-09-22T23:23:01+5:302018-09-22T23:23:48+5:30

पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, शनिवारी पाच महापालिका कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. आयुक्त संजय निपाणे यांनी त्याबाबतचे आदेश शनिवारी जारी केले. पाच कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एका कंत्राटी स्वास्थ्य निरीक्षकाला बडतर्फ करण्यात आले आहे. निलंबितामध्ये एक ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, एक स्वास्थ्य निरीक्षक, दोन बिटप्यून व एका कनिष्ठ लिपिकाचा समावेश आहे. नीलेश गाडे असे बडतर्फ करण्यात आलेल्या कंत्राटी स्वास्थ्य निरीक्षकाचे नाव आहे.

Five employees suspended, one contract big | पाच कर्मचारी निलंबित, एक कंत्राटी बडतर्फ

पाच कर्मचारी निलंबित, एक कंत्राटी बडतर्फ

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या पाहणीदौऱ्याचा ‘इफेक्ट’ : दोघांचे निलंबन टळले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, शनिवारी पाच महापालिका कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. आयुक्त संजय निपाणे यांनी त्याबाबतचे आदेश शनिवारी जारी केले. पाच कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एका कंत्राटी स्वास्थ्य निरीक्षकाला बडतर्फ करण्यात आले आहे. निलंबितामध्ये एक ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, एक स्वास्थ्य निरीक्षक, दोन बिटप्यून व एका कनिष्ठ लिपिकाचा समावेश आहे. नीलेश गाडे असे बडतर्फ करण्यात आलेल्या कंत्राटी स्वास्थ्य निरीक्षकाचे नाव आहे.
आठ कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली, तर तिघांची बदली करण्यात आली. अख्खे शहर डेंग्यूने कह्यात घेतल्याच्या पार्श्वभूमिवर पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गुरुवारी शहरातील विविध भागात जाऊन अस्वच्छतेची पाहणी केली होती. पाहणीदरम्यान प्रभागासह सुकळी कंपोस्ट डेपोतील ट्रक व कंटेनरच्या नोंदीमध्ये अनियमितता असल्याचे गंभीर निरीक्षण त्यांनी नोंदविले. त्याचवेळी सर्व संबंधितांचे निलंबन व अन्य कारवाईचे आदेश त्यांनी आयुक्त संजय निपाणे यांना दिले होते. बरहकूम स्वच्छता विभागाने शुक्रवारी ७ कर्मचाऱ्यांचे निलंबन, तर आठ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्तावित केली. त्यावर आयुक्त निपाणे यांनी शनिवारी दुपारी स्वाक्षरी करून अंतिम शिक्कामोर्तब केले. निलंबितामध्ये शेगाव रहाटगाव प्रभागातील बिटप्यून विनोद खोडे, जमिल कॉलनी प्रभागाचे स्वास्थ्य निरिक्षक संजय घेंगट व बिटप्यून संदीप सारसर, सुकळी कंपोस्ट डेपोतील कनिष्ट लिपिक नरेश उईके व ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक किशोर संगेले यांचा समावेश आहे. संगेले हे गुरुवारी पूर्वसूचना न देता गैरहजर होते. त्यांनाही निलंबित करण्यात आले. ज्या चार बिटप्यून, स्वास्थ्य निरीक्षक व कनिष्ठ लिपिकाला निलंबित करण्यात आले, त्या प्रभागात व सुकळी कंपोस्ट डेपोला पालकमंत्र्यांनी भेट दिली होती.
कारवाईत गौडबंगाल !
स्वच्छता विभागाने शुक्रवारी ७ कर्मचाºयांचे निलंबन प्रस्तावित केले होते. मात्र, विभागाने प्रस्तावित केल्यानुसार, त्यात सुकळी कंपोस्ट डेपोतील कनिष्ठ लिपिक गोपाल घुरडे व बिटप्यून संजय वाघोळकर यांचा समावेश होता. मात्र, आश्चर्यकारकरीत्या शनिवारी निघालेल्या निलंबन आदेशातून दोन नावे वगळण्यात आली. वाघोळकर व घुरडे यांचे निलंबन न करता पैकी एकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. घुरडे यांना बदलीचे अभय देण्यात आले. गैरहजर असलेले संगेले यांना कारणे दाखवा नोटीस प्रस्तावित केली असताना त्यांना निलंबित करण्यात आले आहे. आयुक्त संजय निपाणे यांनी स्वच्छता विभागाने प्रस्तावित केलेली निलंबनाची कारवाई मागे का घेतली, याबाबत संशयकल्लोळ उठला आहे. याबाबत स्वच्छता अधिकारी अजय जाधव यांनी समर्पक प्रतिसाद दिला नाही.
यांना बजावली कारणे दाखवा नोटीस
स्वास्थ्य निरीक्षक श्रीकांत डवरे, कंत्राटी स्वास्थ्य निरीक्षक महेश पळसकर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक आय.आर.खान , सिध्दार्थ गेडाम व राजू डिक्याव व बिटप्यून संजय वाघोळकर, नरेंद्र डूलगज व सुनिता राजेश धवसेल यांना निलंबित का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. सुकळी कंपोस्ट डेपोतील कनिष्ठ लिपिक गोपाल घुरडे यांची क्रीडा विभागात दिनेश निंधाने यांची नवसारी प्रभागात व कंत्राटी स्वास्थ्य निरीक्षक परीक्षित गोरले यांची प्रभाग-२ मध्ये बदली करण्यात आली.
प्रशासनाकडून लपवाछपवी
शनिवारी केलेल्या निलंबन, बदली व अन्य कारवाईबाबत प्रचंड गोपनियता बाळगली गेली. केवळ कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाºयांची नावे तितकी कार्यालय अधीक्षक दुर्गादास मिसाळ यांनी व्हॉट्सग्रुपवर टाकली. कारवाईबाबतचे आदेश देण्यास मिसाळांनी असमर्थतता दर्शविली. स्वच्छता अधिकारी अजय जाधव यांच्या हस्ताक्षरातील १५ नावांची यादी प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली. अधिकृतरीत्या जनसंपर्क तथा सामान्य प्रशासन विभाग किंवा आयुक्त कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली नाही. आयुक्तांशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Five employees suspended, one contract big

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.