पाच लाख क्विंटल तुरीचे मातेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:49 AM2018-04-10T00:49:43+5:302018-04-10T00:49:43+5:30

जिल्ह्यातील १२ केंद्रांवर ८ एप्रिलपर्यंत ३.६० लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असली तरी किमान पाच लाख क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. १८ एप्रिल ही डेडलाइन देण्यात आली. यामध्येही तीन सार्वजनिक सुट्या आल्याने केंदे्र बंद राहतील. उर्वरित पाच दिवसांत पाच लाख क्विंटल तूर खरेदी अशक्यप्राय असल्याने ३९ हजार शेतकºयांना तुरी व्यापाऱ्यांनाच बेभाव विकाव्या लागणार आहेत.

Five lakh quintals of turmeric | पाच लाख क्विंटल तुरीचे मातेरे

पाच लाख क्विंटल तुरीचे मातेरे

Next
ठळक मुद्देकेंद्रांना १८ एप्रिलची डेडलाईन : पाच दिवस हाती, ३९ हजार शेतकऱ्यांची खरेदी बाकी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील १२ केंद्रांवर ८ एप्रिलपर्यंत ३.६० लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असली तरी किमान पाच लाख क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. १८ एप्रिल ही डेडलाइन देण्यात आली. यामध्येही तीन सार्वजनिक सुट्या आल्याने केंदे्र बंद राहतील. उर्वरित पाच दिवसांत पाच लाख क्विंटल तूर खरेदी अशक्यप्राय असल्याने ३९ हजार शेतकºयांना तुरी व्यापाऱ्यांनाच बेभाव विकाव्या लागणार आहेत.
जिल्हा तूर उत्पादकतेच्या एकूण २५ टक्के प्रमाणातच तूर खरेदी करावी, असे स्पष्ट निर्देश सरव्यवस्थापकांनी सर्व ‘डीएमओं’ना दिलेत. यामुळे सद्यस्थितीत ६१,९२७ शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली असली तरी प्रत्यक्षात २३,०१७ शेतकऱ्यांची ३.६० लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आल्याचे वास्तव आहे. यंदाच्या हंगामात साधारणपणे १ लाख १० हजार हेक्टर तुरीचे क्षेत्र होते व कृषी विभागाने हेक्टरी सरासरी उत्पादकता १३.५० क्विंटल जाहीर केली.
शनिवारी ८६१ क्विंटल तूर खरेदी
जिल्ह्यात यंदा १४.८५ लाख क्विंटल तुरीचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. यापैकी सहा ते सात लाख क्विंटल तूर नाफेडच्या दिरंगाईमुळे खासगी बाजारात विकल्या गेली असली तरी अद्याप शेतकऱ्यांच्या घरात किमान पाच लाख क्विंटल तूर पडून आहे. आता तूर खरेदीला पाचच दिवस बाकी आहे. जिल्ह्यात सध्या गोडाऊनचा अभाव असल्याने तूर खरेदी मंदावली आहे. ७ तारखेला आठ केंद्रांवरील तूर खरेदी निरंक आहे. उर्वरित चार केंद्रांवर फक्त ८६१ क्विंटल खरेदी करण्यात आली.
जिल्ह्यातील बाराही केंद्रावर तूर खरेदीच्या नावावर निव्वळ टाईमपास सुरू आहे. गतवर्षी दरदिवशी १५ ते २० हजार क्विंटल खरेदी होत असताना यंदा मात्र केविलवानी स्थिती निर्माण झाली आहे. येत्या पाच दिवसांत किमान पाच लाख क्विंटल तूर खरेदी करणे अशक्य असल्याने या तुरीच्या घुगऱ्या कराव्यात काय, असा शेतकºयांना संतप्त सवाल आहे.
अशी आहे केंद्रनिहाय खरेदी
च्अचलपूर केंद्रावर ३२,५५५, अमरावती ५२,७३५, अंजनगाव सुर्जी १९,९२१, चांदूरबाजार २९,०८२, चांदूर रेल्वे २९,२६२, दर्यापूर ५६८७५, धारणी ७,०१२, नांदगाव खंडेश्वर १७,४३२, तिवसा १७,९९६ ,धामणगाव २४,९९०, मोर्शी ३७,१०२ व वरुड तालुक्यात ३४,१७३ क्विंटल खरेदी करण्यात आली.

तूर साठवणुकीसाठी गोदामांची कमतरता आहे, तर हरभरा खरेदीबाबत ग्रेडर कमी आहेत. आता ग्रेडर उपलब्ध होतील व बुटीबोरीचे गोदामदेखील उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मुदतीपूर्वी अधिकाधिक तूर खरेदीचा प्रयत्न राहील.
- रमेश पाटील, डीएमओ

Web Title: Five lakh quintals of turmeric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.