म्युकरमायकोसिसचे अमरावतीत पाच महिन्यांत आढळले ६६ रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:11 AM2021-05-17T04:11:53+5:302021-05-17T04:11:53+5:30

कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर आता जीवघेण्या म्युकरमायकोसिस( काळी बुरशीजन्य) या आजाराचा धोका वाढला आहे. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत जानेवारी ते ...

In five months, 66 patients were diagnosed with mucorrhoea in Amravati | म्युकरमायकोसिसचे अमरावतीत पाच महिन्यांत आढळले ६६ रूग्ण

म्युकरमायकोसिसचे अमरावतीत पाच महिन्यांत आढळले ६६ रूग्ण

Next

कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर आता जीवघेण्या म्युकरमायकोसिस( काळी बुरशीजन्य) या आजाराचा धोका वाढला आहे. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत जानेवारी ते १५ मे २०२१ दरम्यान या आजाराचे साडेचार महिन्यात शासकीय व खासगी डॉक्टरांकडे ६६ रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १० रुग्णांवर इर्विन रुग्णालयातील १६ क्रमांकाच्या वार्डमध्ये उपचार करण्यात आला त्यापैकी ५ रुग्ण बरे झाल्याची माहिती जिल्हाशल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. वेळीत उपचार झाला तर रुग्ण जरी बरे होत असले तरीही या आजाराचे रुग्ण वाढत असताना त्यावर उपचाराकरिता उपयुक्त ठरत असलेले ‘लिपोसोमल’, ‘एम्फोटीसिरीन-बी’, या इंजेक्शनचा जिल्ह्यासह राज्यात तुटवडा असल्याने सदर इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागत असल्याचे वास्तव आहे. हा आजार झाल्यानंतर रुग्णाच्या प्रकृती व वयोगटानुसार ३ ते ६ इंजेक्शनचा डोस प्रतिदिन असे दोन ते तीन आठवडे द्यावे लागतो असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. सदर इंजेकशन हे महागडे असून सात ते आठ हजारात मिळते म्हणजे प्रतिदिन रुग्णाला ५० हजाराच्या घरात खर्च असून तो खर्च लाखात जात असल्याचे वास्तव आहे. मात्र इंजेक्शनचा तुटवडा असल्याने उपचार करणाऱ्या डॉक्टरांची सुद्धा गोची झाली आहे. म्युकरमायकोसिस संशयित महिला रुग्णाचा रविवारी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्या महिलाला कोविड नंतर हा आजार झाला होता. त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार झाला. मात्र हा मृत्यू म्युकरमायकोसिसनेच झाल्याचे अद्यापही शासकीय यंत्रणा किंवा आरोग्य यंत्रणेने जाहीर केलेले नाही.

बॉक्स:

५० पेक्षा जास्त इंजेक्शनची रोजची मागणी

शहरात १५ पेक्षा जास्त नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉक्टर आहे. मात्र म्युकरमायकोसिस हा आजार झाल्यानंतर त्याचा प्रथम प्रादुर्भाव हा सायनस( नाकाच्या मागच्या भागात) होत असल्याने त्याची तातडीने शस्रक्रीया करावी लागते. अशा प्रकारची शस्रक्रीया करणारे शहरात तीन ते चार डॉक्टर असल्याची माहिती कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. क्षीतिज पाटील यांनी दिली. कोरोनाच्या काळात आम्ही शंभर रुग्णांची तपासणी केली तर चार ते पाच रुग्ण आढळून येत असल्याचे त्यांनी सांगितले. रोज सरासरी ५० पेक्षा जास्त इंजेक्शनची मागणी असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र तुटवडा असल्याने उपचार कसा करावा? असा प्रश्नही डॉक्टरांसमोर आहे.

बॉक्स:

रुग्णाला लागतो तीन ते सहा डोस

म्युकरमायकोसिसच्या ज्या रुग्णांवर उपचार सुरु आहे. त्या रुग्णाच्या प्रकृतीनुसार व आजारानुसार त्याला प्रति दिन ३ ते ६ डोस लागता सदर डोस दोन ते तीन आठवडे द्यावे लागतात म्हणजे ६० ते १२६ डोस रुग्णाला द्यावे लागत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. मात्र सदर इंजेक्शन महागडे असल्याने त्याचा उपचार लाखात जातो. सर्जरी करण्याचे काम पडले तर लाखो रुपयांचा खर्च येत असल्याचे वास्तव आहे.

कोट

सध्या ‘म्युकरमाकोसिसच्या’ उपचाराकरिता उपयुक्त असलेले इंजेक्शन उपलब्ध नाही त्याचा तुटवडा असल्याने इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे याकरीता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.

डॉ मनोज निचत हदय व मधुमेह तज्ज्ञ

कोट

कोविडमुळे रुग्णांची शुगर वाढते. रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे कोविडनंतर हा आजार होत आहे. पुर्वी वर्षभरात एक किंवा दोन रुग्ण आढळून यायचे परंतू आता शंभर रुग्णांची तपासणी केली तर चार किंवा पाच रुग्ण आढळून येत आहे. फंगल इन्फेक्शन प्रथम सायन्स म्हणजे नाकाच्या मागच्या भागात होते. त्वरीत निदान न झाल्यास, जबडा,डोळे व मेंदूपर्यंत हा आजार वाढतोे व रुग्णाचा मृत्यू सुद्धा होतो. मी आतापर्यंत या आजाराच्या २५ शस्रक्रीया केल्या. सर्व रुग्ण चांगले आहेत.

डॉ. क्षीतीज पाटील

नाक, कान घसा तज्ज्ञ अमरावती

कोट

म्युकरमाकोसिसच पाच महिन्यात ६६ रूग्ण आढळून आले मात्र गत आठवड्यात १० रूग्ण दाखल होते. त्यापैकी पाच रूग्ण बरे झाले पाचवर उपचार सुरु आहे.

डॉ. श्यामसुंदर निकम जिल्हाशल्यचिकित्सक अमरावती

कोट

डॉक्टर हिंमाशु देशमुख यांचे कोट आहे.

Web Title: In five months, 66 patients were diagnosed with mucorrhoea in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.