पुन्हा पाच मृत्यू, ३९६ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:13 AM2021-03-28T04:13:27+5:302021-03-28T04:13:27+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गात मृत्यूचे सत्र सुरूच आहे. शनिवारी पुन्हा पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमितांचे मृत्यूची संख्या ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गात मृत्यूचे सत्र सुरूच आहे. शनिवारी पुन्हा पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमितांचे मृत्यूची संख्या ६५७ वर झाली आहे. याशिवाय ३९६ अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ४७,६७९ झालेली आहे.
जिल्ह्यात शनिवारी ३,९१४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात १०.११ पॉझिटिव्हिटी नोंदविण्यात आलेली आहे. दोन दिवसांच्या तुलनेत शनिवारी चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दोन टक्क्यांनी वाढली व नमुने तपासणी वाढलेली आहे.
जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्यावाढ व्हावी, यासाठी सर्वच तालुक्यांत नमुने केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात रोज चार हजार चाचण्यांचे उद्दिष्ट्य असताना त्यापेक्षा जास्त चाचण्या होत आहेत. याशिष्यत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरणदेखील होत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून संसर्ग खंडित करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत आहेत.
बॉक्स
शनिवारी पाच मृत्यू
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माहितीनुसार, अचलपूर येथील ६५ वर्षीय पुरुष, विकासनगरातील ४७ वर्षीय महिला, नांदगाव खंडेश्वर येथील ६५ वर्षीय पुरुष, पथ्रोट येथील ८३ वर्षीय पुरुष, चांदूर रेल्वे येथील ७१ वर्षीय पुरुष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यात संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ६५७ वर पोहोचली आहे.