अमरावतीमध्ये आणखी पाच पॉझिटिव्ह; एकूण ६०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 06:47 PM2020-05-04T18:47:02+5:302020-05-04T18:47:28+5:30
अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सोमवारी ६० वर गेली आहे. येत्या ९ आणि १० मे या शनिवार व रविवारी जिल्ह्यात जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सोमवारी ६० वर गेली आहे. येत्या ९ आणि १० मे या शनिवार व रविवारी जिल्ह्यात जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. या दरम्यान जिल्ह्यातील सर्व सेवा, प्रतिष्ठाने बंद राहतील असे त्यांनी सांगितले आहे.
येथील क्लस्टर हॉटस्पॉटमध्ये चार व ग्रामीणमध्ये एक अशा पाच रुग्णांचे थ्रोट स्वॅब अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात आता कोरोनाग्रस्तांची संख्या ६० वर पोहोचली आहे. यामध्ये १० मृत, ५ कोरोनामुक्त, तर ४५ व्यक्तींवर उपचार सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी येत्या शनिवार व रविवारी जनता कफ्यूर्चे आवाहन केले आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेला सोमवारी ७८ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ५ पॉझिटिव्ह व ७३ निगेटिव्ह आहेत. जिल्हा ग्रामीणमध्ये अमरावती तालुक्यातील शिराळा येथे बाधिताच्या संपकार्तील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. येथील क्लस्टर हॉटस्पॉटमधील हनुमाननगरात दोन व्यक्ती, खोलापुरी गेट येथील एक व्यक्ती व हबीबनगरात १३ वर्षांच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. हबीबनगरात नव्याने कोरोनाग्रस्तांची नोंद झाली, तर अन्य चार कोरोनाग्रस्त हे बाधिताच्या संपर्कात असल्याने संस्थात्मक विलगीकरणात होते. त्यांना आता कोविड रुग्णालयातील दुसºया माळ्यावरील कोविड कक्षात दाखल केले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
दोन दिवस सर्व सेवा बंद
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीच्या उपायासाठी येत्या शनिवारी व रविवारी जनता कफ्यूर्चे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. या काळात रुग्णालय व मेडिकल वगळता सर्व सेवा बंद राहणार आहे. कोरोनाचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी सर्वांनी घरात सुरक्षित राहावे व दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.