मेळघाटला पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:05+5:302021-06-09T04:16:05+5:30
परतवाडा : कोविडच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना प्राणवायू उपलब्ध न झाल्याने प्राण गमवावा लागला. यातच कोविडचा वाढता प्रादुर्भाव आणि तिसऱ्या ...
परतवाडा : कोविडच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना प्राणवायू उपलब्ध न झाल्याने प्राण गमवावा लागला. यातच कोविडचा वाढता प्रादुर्भाव आणि तिसऱ्या लाटेची शक्यता बघता, रोटरी क्लब ऑफ पुणे विस्डम या पुण्याच्या संस्थेने मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठवले आहेत.
धारणी येथील रुग्णालयांकरिता हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले आहेत. रोटरी क्लब ऑफ पुणे विस्डमचे अध्यक्ष राहुल चौधरी, सचिव श्रीकांत चाफेकर, संचालक (सेवा प्रकल्प) नीलेश धोपाडे यांनी हे पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर संच वन्यजीवप्रेमी किशोर रिठे यांच्यामार्फत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांना सोपविण्यात आले. यावेळी निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. निशिकांत काळे, सातपुडा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश लढ्ढा, इर्विनचे डॉ. ऋषीकेश नागलकर, सचिन इंगोले व मेडिट्रस्टचे ललित राठोड हे उपस्थित होते. संबंधित ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर संच प्रशासनाने धारणी येथे पाठविले आहेत. यात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.