तीन दिवसातील अवकाळीने पाच हजार हेक्टरला फटका

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 5, 2023 04:52 PM2023-05-05T16:52:43+5:302023-05-05T16:53:11+5:30

Amravati News जोरदार वादळासह झालेल्या अवकाळी पावसाने ४९७१ हेक्टरमधील गहू, कांदा व संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.

Five thousand hectares were affected by bad weather in three days | तीन दिवसातील अवकाळीने पाच हजार हेक्टरला फटका

तीन दिवसातील अवकाळीने पाच हजार हेक्टरला फटका

googlenewsNext

गजानन मोहोड

अमरावती:  जिल्ह्यात तीन दिवसांत पाच तालुक्यांमध्ये जोरदार वादळासह झालेल्या अवकाळी पावसाने ४९७१ हेक्टरमधील गहू, कांदा व संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.


मार्च महिन्यापासून जिल्ह्यात सात वेळा अवकाळी पाऊस झालेला आहे. यामध्ये रब्बी पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २ मे रोजी झालेल्या अवकाळीने ५२ घरांची पडझड झाली. याशिवाय भातकुली तालुक्यात ३.९२ हेक्टर, मोर्शीत ४१५० हेक्टर, दर्यापुरात २३ हेक्टर व अचलपूर तालुक्यात १०७ हेक्टरमध्ये नुकसान झाले. दुसऱ्याच दिवशी म्हणजे, ३ मे रोजी पुन्हा अचलपूर तालुक्यात २११ हेक्टर तसेच ४ तारखेला झालेल्या अवकाळीने मोर्शी तालुक्यात २१० व अचलपूर तालुक्यात २६५.६ हेक्टरमधील गहू, कांदा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: Five thousand hectares were affected by bad weather in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती