गोरगरिबांना मिळणार पाच हजार घरे

By admin | Published: December 26, 2015 12:16 AM2015-12-26T00:16:49+5:302015-12-26T00:16:49+5:30

महागाईच्या काळात गोरगरीब नागरिकांना हक्काचे घर सुलभरीत्या उपलब्ध व्हावे,...

Five thousand houses will be given to the poor | गोरगरिबांना मिळणार पाच हजार घरे

गोरगरिबांना मिळणार पाच हजार घरे

Next

बैठक : गृहनिर्माण मंत्र्यांनी दिली हिरवी झेंडी
अमरावती : महागाईच्या काळात गोरगरीब नागरिकांना हक्काचे घर सुलभरीत्या उपलब्ध व्हावे, या हेतुने अकोली-म्हाडा परिसर तसेच बडनेरा-अंजनगाव बारी म्हाडा परिसरात अंदाजे पाच हजार घरे बांधण्यात येणार आहेत. याबाबत राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या दालनात बुधवारी बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला आ. रवी राणा उपस्थित होते.
प्रत्येकी ३ लक्ष ५० हजार रूपयांमध्ये ही घरे गरजू नागरिकांना उपलब्ध करून दिली जातील. बडनेरा मतदारसंघातील सर्व जातीच्या गोेरगरीब कुटुंबांची घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्गत मौजे अकोली, अमरावती येथे म्हाडा अधिनियम १९७६ च्या कलम ४१ अंतर्गत ५०.९९ हे.आर. जमीन सन १९८६-८७ मध्ये संपादित करण्यात आली आहे.
उपरोक्त एकूण ११.६७ हे.आर. जमिनीपैकी राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ मध्ये एकू’ १६१०० चौरस मीटर जमीन बाधित झाली आहे. तसेच विद्युत विभागाच्या ट्रान्समिशन झोनमध्ये एकूण ८४०० चौ.मी. जमीन बाधित होत आहे. शिल्लक जमिनीवर मंडळातर्फे २४३ गाळ्यांची योजना प्रस्तावित आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Five thousand houses will be given to the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.