मेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 10:00 PM2018-12-16T22:00:58+5:302018-12-16T22:01:59+5:30

मेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार झाली असून, या शिकारी २०१७-१८ मधील आहेत. या सर्व शिकारी पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत बफर क्षेत्रात घडल्या आहेत, तर एका वाघाची शिकार मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत कोअर क्षेत्रात २०१३ मध्ये घडली आहे.

Five-tigers hunting in Mellaghat in just six months | मेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार

मेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार

Next
ठळक मुद्देएका वाघाची शिकार पाच वर्षांपूर्वी : वाघांच्या शिकारीस मुख्य वनसंरक्षकांचा दुजोरा

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार झाली असून, या शिकारी २०१७-१८ मधील आहेत. या सर्व शिकारी पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत बफर क्षेत्रात घडल्या आहेत, तर एका वाघाची शिकार मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत कोअर क्षेत्रात २०१३ मध्ये घडली आहे.
व्याघ्र प्रकल्पांतर्गत २०१३ मध्ये घडलेल्या शिकारीसंदर्भात काही पुरावे अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहेत. हाती आलेले जैविक नमुने व्याघ्र प्रकल्प अधिकाºयांनी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. या वाघांच्या शिकारीस मुख्य वनसंरक्षकांनी दुजोरा दिला आहे.
पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत अंजनगांव वनपरिक्षेत्रातील खोंगड गावाच्या शेतीच्या बाजूला पहिला वाघ २०१७ च्या दिवाळीत, दुसरा वाघ २०१७ च्या हिवाळ्यात लाल मामा मंदिराजवळ, तिसरा वाघ २०१८ च्या होळीला गिरगुटीजवळ रक्षा नालानजीक, चौथा वाघ दहा महिन्यांअगोदर सचिन बेलसरे यांच्या शेताजवळ शिकाºयांनी मारला. पाचवा वाघ (बिबट) २०१८ मधील होळीच्या एक महिन्याआधी शंकर जामुनकर यांचे शेतात मारण्यात आला. आरोपी संजय उर्फ बंसीलाल हिरालाल जामुनकर (रा. गिरगुटी) यांचे बयानावरुन चौकशी अधिकाºयांना ही माहिती मिळाली. पूर्व मेळघाट वनविभागाचे सहायक वनसंरक्षक अशोक पºहाड यांच्यासमोर हे बयान नोंदविले गेले आहे.
दरम्यान, मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सन २०१३ मध्ये झालेल्या वाघाच्या शिकारीच्या अनुषंगाने चौकशी सुरु आहे. यात वनखंड ८६० मध्ये मुसळीची तस्करी आणि सायाळची शिकार ८ आॅगस्ट २०१८ ला घडली आहे.
यात गिरगुटी येथील ३२ आरोपी आहेत. वनखंड ९४६ मध्ये १८ सप्टेंबर २०१८ ला सांबराची शिकार झाली. त्यात १३ आरोपी आहेत. वनखंड ९४५ मध्ये चांदी अस्वल आणि सायाळची शिकार २० सप्टेंबर २०१८ ला झाली आहेत.
यात १२ आरोपी असून, या तिन्ही गुन्ह्यांत सानू तानू दारसिम्बे (रा. गिरगुटी) हा मुख्य आरोपी आहे. हे सर्व वनखंड मेळघाट व्याघ्र्र प्रकल्पाच्या चिखलदरा वनपरिक्षेत्रातील आहेत. यात चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी प्रथम गुन्हा रिपोर्ट दाखल केला आहे.
पुरावे अद्याप दूरच
पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत सहा महिन्यांत घडलेल्या पाच वाघांच्या हत्येसंदर्भात शिकार झालेले ठिकाण, अवयव व शिकारीसाठी वापरलेले हत्यार आदी पुरावे चौकशी अधिकाऱ्यांच्या हाती लागलेले नाहीत.

Web Title: Five-tigers hunting in Mellaghat in just six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.