तहसीलदाराने पकडले अवैध रेतीचे पाच ट्रक

By admin | Published: March 26, 2015 12:05 AM2015-03-26T00:05:43+5:302015-03-26T00:05:43+5:30

यवतमाळ येथून अमरावतीकडे अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक नवनियुक्त तहसीलदाराने पकडून थेट पोलीस कारवाई केली आहे़ महसूल प्रशासनात कोणतीही नियमबाह्य कामे होणार नाहीत.

Five trucks of illegally caught track of tahsildar | तहसीलदाराने पकडले अवैध रेतीचे पाच ट्रक

तहसीलदाराने पकडले अवैध रेतीचे पाच ट्रक

Next

धामणगाव रेल्वे : यवतमाळ येथून अमरावतीकडे अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक नवनियुक्त तहसीलदाराने पकडून थेट पोलीस कारवाई केली आहे़ महसूल प्रशासनात कोणतीही नियमबाह्य कामे होणार नाहीत. उलट नियमबाह्य कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा तहसीलदार राजन यांनी बुधवारी दिला.
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी षण्मुख राजन यांची तहसीलदारपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अवैधरीत्या रेती वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत़ धामणगाव तालुक्यातील वर्धा नदीतील रेतीघाटांचा लिलाव अद्याप व्हायचा असताना यवतमाळ जिल्ह्यातून अवैधरीत्या अमरावतीकडे रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच तहसीलदारांनी मंगळवारी रेतीने भरलेले पाच ट्रक पकडले. यात दोन ब्रासपेक्षा अधिक रेती असल्यामुळे त्यांनी थेट फौजदारी कारवाई केली़
रेतीची वाहतूक करताना ट्रकमध्ये केवळ दोन ब्रास रेती असणे गरजेचे आहे़ यापेक्षा अधिक रेती आढळल्यास संपूर्ण ट्रकमधील रेतीवर दंड आकारण्यात येणार आहे़ तसेच ट्रकमालक व चालकांवर थेट फौजदारी कारवाईदेखील केली जाणार आहे़ यासाठी त्यांनी पाच विशेष पथकांची नियुक्ती केली आहे़ रात्री अवैधरीत्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकवर थेट फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदार राजन यांनी दिले आहेत. दरम्यान, तहसील कार्यालयात सर्वसामान्य माणसांना कोणताही त्रास होऊ नये, याची दखल महसूल कर्मचाऱ्यांनी घ्यावी तसेच तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश त्यांनी बुधवारी दिले़ (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Five trucks of illegally caught track of tahsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.