वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाच प्रकारच्या चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:00 AM2018-01-16T00:00:58+5:302018-01-16T00:01:22+5:30

येथील प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या टोलेजंग इमारतीत पाच प्रकारच्या चाचण्या होतात.

Five types of tests in the scientific laboratory | वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाच प्रकारच्या चाचण्या

वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाच प्रकारच्या चाचण्या

Next
ठळक मुद्देसर्वाधिक दारूच्या चाचण्या : वन्यप्राण्यांचीही तपासणी

मनीष कहाते।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : येथील प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या टोलेजंग इमारतीत पाच प्रकारच्या चाचण्या होतात. खून, बलात्कार आणि पोस्टमार्टम इत्यादींच्या नमुन्याची चाचणी केली जाते. त्यामध्ये सर्वाधिक चाचण्या देशी, विदेशी दारूच्या झाल्या आहेत. चाचण्यांचा अधिकृत रिपोर्ट आल्यानंतरच पोलिसांना तपासाची योग्य दिशा समजते.
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा २० कोटी रूपये खर्च करून सुसज्ज बांधलेली आहे. त्यामध्ये विविध चाचण्यांचे वेगवेगळे वातानुकूलित दालने तयार केली आहे. यामध्ये विषशास्त्र विभाग, जीवशास्त्र विभाग, दारूबंदी व उत्पादन शुल्क विभाग, सामान्य विश्वलेशन व उपकरण विभाग व ध्वनी विश्वलेशन विभाग इत्यादी विभाग कार्यरत आहेत. विष प्राशन विभागामध्ये मनुष्याने विष पिऊन आत्महत्या केली असल्यास त्याची संपूर्ण चाचणी केली जाते. त्यानुसार अहवाल पोलीस खात्याला देण्यात येतो. नंतर कारवाई होते. जीवशास्त्र विभागात खून, बलात्कार, विनयभंगाच्या चाचण्या महागड्या यंत्राद्वारे केली जाते. दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागात देशी-विदेशी दारूतील घटक किती याची तपासणी झाल्यानंतरच दारू विक्रीसाठी कारखान्याच्या बाहेर पडते. माणून दारू पिऊन धिंगाणा घालतो त्यावर पोलीस कारवाई करते. त्याच्या रक्ताच्या नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. त्यावरच पोलिसांची कारवाई अवलंबून राहते. सामान्य विश्वलेशन व उपकरण विभागांतर्गत पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि अंमली पदार्थांच्या चाचण्या होतात. ध्वनी विश्लेषण विभागात संभाषण आणि मोबाईलचा बोललेल्या आवाजाची तपासणी होते. एखादा व्यक्ती म्हणतो की, हा माझा आवाज नाही आहे. परंतु संबंधित पोलिसांना आवाजाचा अधिकृत पुरावा लागतो. त्यामुळे आवाजाची चाचणी प्रयोगशाळेत केली जाते. वरील सर्व चाचण्यांना विशेष खर्च येत नसला तरी डी.एन.ए. तपासणीच्या प्रत्येक चाचणीला सुमारे आठ हजार रूपये खर्च येतो. कारण या चाचण्या तपासणीचे सर्व केमिकल परदेशातून येतात. त्यामुळे या चाचणीला सर्वाधिक खर्च येतो. सर्व प्रकारच्या चाचण्या करण्याकरिता नमुने पोलीस खाते प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवितात. पोलिसांना तपासाची दिशा आणि गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयोगशाळेचा अहवाल महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रयोगशाळेशी थेट सामान्य जनतेचा संपर्क येत नाही. पोलिसानंतरची महत्वाची भूमिका वैज्ञानिक प्रयोगशाळा राबविते.
प्रयोगशाळेत वर्षभरात सर्वाधिक १९ हजार चाचण्या केवळ दारू आणि मद्यपींच्या झाल्यात. त्या खालोखाल बलात्कार आणि विनयभंगांच्या ५५०० चाचण्या विभागात झाल्यात. १७०० चाचण्या विषशास्त्र विभागा झाल्या. २०० चाचण्या सामान्य विश्लेषण व उपकरण विभागात झाल्यात. १५० चाचण्या ध्वनी विश्लेषण विभागात झाल्यात. अशा एकूण २६,७५० चाचण्या प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत करण्यात आल्या आहेत. त्यापैकी सुमारे २३ हजार चाचण्या पूर्ण झाल्यात. त्याचा संपूर्ण अहवाल संबंधित विभागाला पाठविला आहे. उर्वरित विभागाच्या चाचण्या सुरू आहेत.
प्रादेशिक प्रयोगशाळेमध्ये महिन्याला शवविच्छेदनाचे सर्वाधिक ३५० नमुने तपासण्याकरिता येथे येतात. विविध प्रकारच्या चाचण्या करण्यासाठी ४० अधिकारी सुसज्ज प्रयोगशाळेमध्ये कार्यरत आहेत.

अमरावतीमध्ये लवकरच डी.एन.ए. चाचणीला सुरुवात केली जाईल. त्याकरिता सात कोटी रूपयांची प्रयोगशाळा तयार झाली आहे. प्रयोगशाळेला प्रशंसापत्र भेटले आहे.
- विजय ठाकरे, उपसंचालक, प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा

Web Title: Five types of tests in the scientific laboratory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.