वणवा संशोधनासाठी पाच विद्यापीठांकडे धुरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 08:27 PM2019-06-26T20:27:19+5:302019-06-26T20:27:30+5:30

राज्य शासन गंभीर : जंगलाचे सर्वेक्षण, माती तपासणी वर भर

Five universities have axial axis for research | वणवा संशोधनासाठी पाच विद्यापीठांकडे धुरा 

वणवा संशोधनासाठी पाच विद्यापीठांकडे धुरा 

Next

 -गणेश वासनिक 
अमरावती : राज्यातील वनक्षेत्रांना गेल्या काही वर्षापासून लागत असलेल्या वणव्यामुळे राज्यशासनाने त्याची गंभीर दखल घेत यावर संशोधन करुन उपाययोजना आखण्याकरिता वनविभागाला ठोस कारणे शोधण्याचे निर्देश दिले आहे. संशोधनाकरिता राज्यातील ३ अकृषी विद्यापीठ तर दोन कृषी विद्यापीठ वणव्याचा अभ्यास करून राज्यशासनाला अहवाल देणार आहे.


राज्यात विशेषत: विदर्भातील वनक्षेत्र दरवर्षी वनांच्या आगीमुळे धुमसतेय. कोकण सारख्या वनांना सुध्दा आगी लागत असल्याने दरवर्षी अन्हाळ्यात २१००० ते ३८००० हेक्टर वनक्षेत्र जळून राख होत आहे. अमरावती जिल्ह्यात मेळघाटमध्ये दरवर्षी १००० हेक्टरच्यावर वनक्षेत्र आगी जळते.  परिणामी वनवणव्याचा मोठ्या प्रमाणात वन्यजीव, सुक्ष्म किटक, पक्षी, सरपटणारे प्राणी, गवत मौल्यवान प्रजाती नष्ट होत आहे. वनवनव्याचे आरोपी कमी प्रमाणात मिळत असल्याने दरवर्षी जंगलास आगी लावण्याच्या घटना घडत आहे. वनकायद्याचा धाक असला तरी अपुरे मनुष्यबळ, खुली संपत्ती या कारणाने जंगलास आगी लावणाºयांचे मनोबल धजावत आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागणाºया आगीमुळे वनांचे हवी तशी वाढ होत नसल्याचा निष्कर्ष वनविभागाने काढलेला आहे.


शासनाची दखल
राज्य शासनाने सन २०१८-१९ मध्ये वनवणवा संबंधित संशोधन व सर्व्हेक्षण करण्याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्रजळगाव विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कृषी विद्यापीठ यांच्याकडे संशोधनाची धुरा सोपविली आहे.अकृषी आणि कृषी विद्यापीठांचे प्राध्यापक जंगलात जाऊ न सतत ३ ते ५ वर्षे आग लागणाºया जंगलातील ठिकाणांचे सर्व्हे करून माती तपासणार आहे. या ठिकाणी लागणाºया आगीमुळे वनक्षेत्रावर त्याचा काय परिणाम झालेला आहे. याचे आकलन करून तसा अहवान वनविभागामार्फत राज्य शासनाला सादर करणार आहे.


विदर्भातील वनांचे सर्व्हेक्षण
राज्यात विदर्भात चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती (मेळघाट), बुलढाणा, गचिरोली, गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रांना आगी लावल्या जातात. बहुतांश आगी ह्या मानव निर्मित असल्याचे पुढे आलेले आहे. परिणामी आरोपी मिळत नसल्याने वनविभाग हतबल आहे. कोट्यवधीची वनसंपदा वनात जळत आहे. यावर उपाय योजना केल्या जात असल्या तरी त्या कुचकामी ठरत आहे.


ब्लोअर मशीन पर्याय
गेल्या ३ वर्षापासून वनवणवा रोखण्यासाठी वनविभागाने आग नियंत्रणाकरिता ब्लोअर मशीन उपलब्ध करून दिल्यात. मात्र, ही संख्या अपुरी आहे. प्रत्येक परिमंडळात केवळ २ ते ३ ब्लोअर मशीन आहेत. त्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. वनवणव्याबाबत संशोधन झाल्यानंतर यात प्रगती होणार किंवा नाही हे बघणे औचित्याचे ठरले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ चमुने वणव्याच्या संशोधनाला सुरूवात केली आहे. तीन वर्षात हा अहवाल वन विभागाला मिळणार आहे. अमरावती प्रादेशिक स्तरावर अगोदरच सुरूवात झाली आहे.
      - प्रवीण चव्हाण
       मुख्य वनसंरक्षक, अमरावती.

Web Title: Five universities have axial axis for research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.