भरधाव एसटीची दुचाकीला धडक; पाच वर्षीय चिमुकला ठार, आई-वडील गंभीर

By प्रदीप भाकरे | Published: February 23, 2023 06:21 PM2023-02-23T18:21:40+5:302023-02-23T18:22:13+5:30

डवरगाव येथे संतप्त नागरिकांचा चक्काजाम

Five-year-old child killed, parents seriously injured as speedy st bus hits bike on morshi amravati route | भरधाव एसटीची दुचाकीला धडक; पाच वर्षीय चिमुकला ठार, आई-वडील गंभीर

भरधाव एसटीची दुचाकीला धडक; पाच वर्षीय चिमुकला ठार, आई-वडील गंभीर

googlenewsNext

अमरावती : मोर्शीहून अमरावतीकडे येणाऱ्या एसटीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पाच वर्षीय बालक जागीच ठार झाला. तर त्याचे आईवडील दोघेही गंभीररीत्या जखमी झाल्याचीघटना डवरगाव फाट्यावर गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली. अन्वित पंकज वलगावकर (५, रा. अंतोरा आष्टी, जि. वर्धा) असे घटनेत ठार झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

घटनेनंतर संतप्त नागरिकांनी डवरगाव येथे राष्ट्रीय महामार्ग रोखून दिड तास चक्काजाम केला. माहुली जहागीर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तातडीने जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले व संतप्त नागरिकांचा जमाव शांत केला. वर्धा जिल्ह्यातील अंतोरा आष्टी येथील पंकज वलगावकर हे पत्नी कविता आणि मुलगा अन्वित यांच्यासह एम एच ३२,ए क्यू ६११० या दुचाकीने काही कामानिमित्त अमरावती येथे येत असतांना भरधाव येणाऱ्या वरुड/ अमरावती या मोर्शीहून येत असलेल्या एसटीने (क्र.एम एच ०६, एस८९५९) दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये समोर बसलेला अन्वित एसटी बसच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाला. तर पंकज आणि कविता दोघेही गंभीररीत्या जखमी झालेत.

घटनेनंतर डवरगाव येथील संतप्त नागरिकांनी क्षणातच महामार्ग बंद केला. डवरगाव येथील महामार्गावर अनेकदा अपघात झाले असून याठिकाणी गतिरोधक बसवावे या मागणीसाठी शेकडो निवेदने प्रशासनाला देण्यात आली मात्र प्रशासन मूग गिळून बसले आहे.

पोलिसांनी केली मध्यस्थी

माहुली जहागीरचे ठाणेदार जयसिंग राजपूत, सहायक उपनिरिक्षक हंबर्डे, अंमलदार पोटे, किरण साधनकर, गजानन धर्माळे, विनोद वाघमारे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तसेच अन्वितचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठविण्यात आला. संतप्त आंदोलकांना विश्वासात घेऊन गतीरोधकाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला पत्रव्यवहार करू, असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर जमावाने आंदोलन मागे घेतले. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Web Title: Five-year-old child killed, parents seriously injured as speedy st bus hits bike on morshi amravati route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.