पाच वर्षांत ५,७३० घरकुले पूर्ण, ४५६८ अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:13 AM2020-12-24T04:13:27+5:302020-12-24T04:13:27+5:30
अमरावती : अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे, यासाठी रमाई घरकुल योजना शासनाकडून राबविण्यात येते. या ...
अमरावती : अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे, यासाठी रमाई घरकुल योजना शासनाकडून राबविण्यात येते. या योजनेंतर्गत पाच वर्षांत केवळ ५,७३० घरकुले पूर्ण झाली असून, ४,५६८ लाभार्थ्यांचे घरकुल अद्यापही अपूर्णच आहेत. त्यामुळे त्यांच्या घरकुलाचे स्वप्न अर्ध्यावरच थांबल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
जिल्ह्यात रमाई घरकुल योजनेंतर्गत पाच वर्षांत १०,२८९ घरकुलांना मंजुरी मिळाली. त्यापैकी ५,७३० घरकुल पूर्ण झाली असून ४५६८ घरकुलांचे काम अर्धवट आहेत. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर अनेकांकडे जागा नसल्याने लाभ घेता येत नसल्याचे चित्र आहे. यावर्षी कोरोनाचा फटका घरकुल लाभार्थ्यांनाही बसला आहे. सन २०१९-२० मध्ये २,९९५ घरकुलांना मंजुरी मिळाली होती. मात्र निधीच नसल्याने एकाही लाभार्थ्याला अनुदान मिळाले नाही. २०२० मध्ये तर त्यापेक्षा बिकट अवस्था आहे. यावर्षी अजुनही लक्षांक निश्चित करता आला नसल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीचे लाभाथ्यीही घरकुलाचे अनुदानापासून वंचित आहेत. सुरुवातीला काही अनुदानाचे एक-दोन टप्पे मिळाले असले तरी अन्य अनुदानाचे टप्पे मिळाले नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे थकीत अनुदानाची रक्कम देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
बॉक्स
बांधकाम साहित्य महागल्याने अडचण
गत काही दिवसांपासून बांधकाम साहित्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दुसरीकडे शासनाकडून मिळणारे अनुदान तेवढेच आहे. अशा स्थितीत घरकुलाचे बांधकाम करताना लाभार्थ्यांना कसरत करावी लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. त्यामुळे अनुदान वाढविण्याची मागणी होत आहे.
बॉक्स
१ लाख २० हजारांचे अर्थसहाय्य
घरकुलासाठी प्रतिलाभार्थी १ लाख २० हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते. जिओ ट्रॅगिंगच्या माध्यमातून बांधकामावर लक्ष ठेवून अनुदानाचे त्याचे पैसे दिले जातात.
बॉक्स
वाळू मिळेना!
जिल्ह्यातील वाळूघाटाचा लिलाव रखडलेला आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी वाळू मिळत नसल्याचे चित्र आहे. मध्यंतरी शासनाने घरकुल लाभार्थ्यांना वाळू देण्याची घोषणा केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही.
बॉक्स
२०१६ -१७ - २२९४
२०८९
२०१७-१८ २०००
१७७१
२०१८-१९- ३०००
१९३०
२०१९-२० -२९९५
०००
२०२०-२१ ०००
००००
बॉक्स
घरांना मंजुरी
घरे पूर्ण