सावधान! सणासुदीच्या काळातच बाजारात नकली नोटांचा सुळसुळाट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 10:09 PM2018-10-24T22:09:55+5:302018-10-24T22:20:22+5:30

सध्या सणासुदीचे दिवस आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडे गरजेपुरता पैसा नसला तरीही संस्कृती जपण्यासाठी जिवाचे आकांततांडव करून कुटुंबाला सुख मिळण्यासाठी घरातील कर्ता व्यक्त प्रयत्नरत असतो. त्यातच सध्या २०० रुपयांच्या नकली नोटा बाजारात आल्याने गरिबांच्या सण उत्सवावर विरजण पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

Fixation of fake notes in the city | सावधान! सणासुदीच्या काळातच बाजारात नकली नोटांचा सुळसुळाट

सावधान! सणासुदीच्या काळातच बाजारात नकली नोटांचा सुळसुळाट

googlenewsNext
ठळक मुद्देग्राहकांना आर्थिक फटका : दोनशेच्या नकली नोटा बाजारात दाखल

चांदूर बाजार : सध्या सणासुदीचे दिवस आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडे गरजेपुरता पैसा नसला तरीही संस्कृती जपण्यासाठी जिवाचे आकांततांडव करून कुटुंबाला सुख मिळण्यासाठी घरातील कर्ता व्यक्त प्रयत्नरत असतो. त्यातच सध्या २०० रुपयांच्या नकली नोटा बाजारात आल्याने गरिबांच्या सण उत्सवावर विरजण पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

नुकताच दसरा झाला असून, या सणात ग्राहकांतर्फे कपडे, किराणा, घरातील शोभनीय वस्तूंच्या खरेदी तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्याकरिता बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी होती. अज्ञातातर्फे शहरातील एका कापड दुकानदाराला दोनशे रुपयांच्या २ नकली नोटा प्राप्त झाल्या. केशरी रंगाच्या या २०० च्या नोटेची हुबेहूब रंगीत झेरॉक्स मारून ही नोट चलनात आणली गेली. संगणकीय प्रणालीत २०० रुपयांची नोट स्कॅन करून उच्च दर्जाच्या कलर प्रिंटरमधून त्याची प्रिंटिंग केल्या गेली व ती बाजारपेठेत चलनातून एक-दुसºयांच्या हाती फिरत गेली. हिंदू धर्मातील सर्वात मोठा मानला जाणारा दिवाळी सण जवळच असून, या सणात ग्राहक नवीन खरेदी करतात. घराची रंगरंगोटी, कापड खरेदी व सजावटीकरिता लागणाऱ्या साहित्यांची खरेदी विक्री केली जाते. या सणात सर्वसाधारण ग्राहकाला या बनावट नोटांचा फटका बसू नये, याअनुषंगाने नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. शहरात सध्या बनावट नोटा चलनात आणणारी टोळी सक्रिय झाल्याचे ताजेच उदाहरण आहे. नोटबंदीनंतर नवीन १०, ५०, १००, २००, ५०० व २००० रुपयांचा नवीन नोटा चलनात आल्या आहेत. दोनशे व पाचशेच्या सर्वाधिक नोटा चलनात असून, दैनंदिन व्यवसायात त्याचा सर्वाधिक वापर केला जातो. याचाच फायदा घेत २०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करून चलनात वापरल्या जात आहेत. यामुळे आर्थिक व्यवहार करताना नोटांची सत्यता पडताळणे गरजेचे झाले आहे. दोनशे रुपयाची बनावट नोटेऐवजी दोन हजार रुपयांची बनावट नोट एखाद्या ग्राहकाला मिळाल्यास त्याला ऐन दिवाळी सणाच्या काळात मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने नोटांची सत्यता पडताळणी करूनच व्यवहार करावे लागणार आहे.

Web Title: Fixation of fake notes in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.