विद्यार्थ्यांविनाच होणार ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:17 AM2021-08-13T04:17:21+5:302021-08-13T04:17:21+5:30
अमरावती : इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू असले तरी स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतील हजारो विद्यार्थ्यांविना होणार आहे. कोरोना संसर्गाची ...
अमरावती : इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू असले तरी स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतील हजारो विद्यार्थ्यांविना होणार आहे. कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी लक्षात घेता. खबरदारीचाच्या दृष्टीने हा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनात शिक्षण विभागाने घेतला.
राज्यात कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात असल्याने अनेक जिल्ह्यात संचारबंदीच्या नियमात शिथिलता आणली आहे. सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. नियम पालन करून कार्यक्रम आयोजित केला जात आहे. त्यामध्ये स्वातंत्र्य दिनाचाही कार्यक्रम राबविण्याचे निर्देश आहे. अलीकडेच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात केवळ जिल्ह्याच्या ठिकाणी एकच समारंभ घेण्याचे निर्देश होते. आता याबाबतचे नवे आदेश जारी करत सर्व शासकीय कार्यालयात ध्वजारोहण होणार आहे. असे असले तरी शाळांमध्ये विद्यार्थ्यांविनाच ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षक व व्यवस्थापन समितीची उपस्थिती असेल कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली.