भरधाव एसटी उलटली

By admin | Published: November 20, 2014 10:42 PM2014-11-20T22:42:21+5:302014-11-20T22:42:21+5:30

भरधाव एसटी बस उलटून विद्यार्थ्यांसह ४३ प्रवासी जखमी झाले असून यातील चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना कोल्हा काकडा ते परतवाडा मार्गावर चमक फाट्यानजीक गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

Fleet ST turned down | भरधाव एसटी उलटली

भरधाव एसटी उलटली

Next

विद्यार्थ्यांसह ४३ प्रवासी जखमी : चमक फाट्यावरील घटना
चमक बु. : भरधाव एसटी बस उलटून विद्यार्थ्यांसह ४३ प्रवासी जखमी झाले असून यातील चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना कोल्हा काकडा ते परतवाडा मार्गावर चमक फाट्यानजीक गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
जखमींमध्ये एसटी वाहक मोहन रामभाऊ पायघन (३३, रा. अंजनगाव सुर्जी), काकडा येथील संतोष देवीदास नवलकर (६०), सोहेल खान सलीम खान (१७), सोहेल खान अय्युब खान (१६), मो. अजहर मो. आरीफ (१७), शे. रिजवान शे. रहेमान (१६), साहेब खाँ शरमद खाँ (१६), रासेगाव येथील प्रिया प्रेमदास धोटे (१८), निलिमा प्रल्हाद शिरदुसे (२४), निकिता राजेंद्र मोरे (१८), मुक्ता केशवराव खांडेकर (१९), पल्लवी गजानन शेकोकार (१८), श्वेता गणेशराव बोबडे (१४), पूनम बाळासाहेब मुऱ्हेकर (१८), अश्विनी अनिल बोबडे (१४), पूजा श्रीकृष्ण मेटकर, यशराज भुयार (१३), दीपा शरद खांडेकर (१७), प्रांजली मुकुंद खांडेकर (१७), राधा राजेंद्र धामणकर (१७),दिपाली राजेंद्र बांडाबुचे (१६), मयुरी बडे (१७), राधा धामणकर (१७), बोर्डी गावातील शुभांगी गजेंद्र शहाणे (२४), समीक्षा गजानन भडांगे (१६), धीरज राजेंद्र अडगोकार (२२) , शारदा प्रल्हाद पवार (१३), भाग्यश्री लक्ष्मण पवार (१०), श्रेय नंदू झुडपे (१२), धनश्री गजानन पवार (१२), समीक्षा प्रमोद शहाणे (१४), दामिनी शिवदास शहाणे (१५), किरण सतीश पाचघरे (१०), अनिकेत गादे(१७),नायगाव येथील नरेंद्र महादेव देशमुख (३०), चौसाळा येथील अश्विनी भास्कर साखरे (१८), मयुरी प्रल्हाद बडे (१७), कोल्हा येथील शिल्पा भास्कर आगरकर (२१), सौरभ विनायक ठाकरे (२१) आदींचा समावेश आहे.
परतवाडा आगाराची एम.एच. ४०/८७२५ क्रमांकाची एसटी कोल्हा काकडा येथे रात्री मुक्कामी होती. विशेषत: विद्यार्थ्यांसाठी ही बस आहे. सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास चालक प्रमोद चांदणे हा प्रवासी घेऊन काकडाहून परतवाड्याकडे निघाला. या बसमध्ये विद्यार्थ्यांसह सुमारे ५० च्या वर प्रवासी होते. चमक फाट्याजवळ चालकाचे भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटले व बस उलटली.

Web Title: Fleet ST turned down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.