गाव खेड्यात देशी-विदेशीचा महापूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:14 AM2021-05-25T04:14:42+5:302021-05-25T04:14:42+5:30
बूट सेलर विकत आहेत कमी दरात देशी-विदेशी धारणी : कोरोना विषाणूच्या अनुषंगाने गेल्या दीड महिन्यापासून लॉक डाऊन लावण्यात ...
बूट सेलर विकत आहेत कमी दरात देशी-विदेशी
धारणी : कोरोना विषाणूच्या अनुषंगाने गेल्या दीड महिन्यापासून लॉक डाऊन लावण्यात आल्यामुळे देशी-विदेशी दारूची दुकाने केवळ घरपोच सेवा देण्यासाठी सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. मात्र तीच दारू इतरत्र मागार्ने मिळवत गावखेड्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विकली जात आहे. यामध्ये हातभट्टीची दारू सुद्धा समाविष्ट असल्यामुळे सर्व प्रकारची ग्राहकी गाव खेड्याकडे आकृष्ट झाल्यामुळे परवानाधारक दुकानदारांचे वांदे झाले आहेत.
धारणी तालुक्यात चार बियर बार असून तीन देशी दारूचे दुकाने आहेत. या सर्व दुकानदारांकडून शासन नियमितपणे कराची वसुली करीत असून सध्या सुरू असलेल्या कोरोना काळातील तालुक्यातील खेड्यापाड्यात सुरू असलेल्या देशी विदेशी दारू विक्रीकडे राज्य विभागाने धृतराष्ट्राची भूमिका घेतल्यामुळे बूट सेलरांची चांदी झाली आहे. परतवाडा व आकोट या ठिकाणावरून दारूच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात दारू खरेदी करण्यात येत असल्याची माहिती आहे. ती दारू परवानाधारक दुकानदारांपेक्षाही कमी दरात गाव खेड्यात उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती आहे.
शिरपूरकडे धाव
धारणी शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर शिरपुर नावाचे गाव आहे. या गावात तीन ते चार अवैधरित्या दारू विक्री करणारे असल्याची माहिती आहे. या लोकांना दारू कुठून प्राप्त होते हे एक कोडेच आहे. धारणी शहरातील दुकानदारांना पेक्षा कमी दरात देशी-विदेशी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती आहे.