खारतळेगाव येथील नाल्याला पूर; दोन तरूण वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:10 AM2021-07-19T04:10:34+5:302021-07-19T04:10:34+5:30

बचाव पथकाकडून शोध : दोन तास वाहतूक ठप्पफोटो पी १८ खारतळेगाव अमरावती/ टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील खारतळेगाव येथील ...

Flooding of nallah at Khartalegaon; Two young men were carried away | खारतळेगाव येथील नाल्याला पूर; दोन तरूण वाहून गेले

खारतळेगाव येथील नाल्याला पूर; दोन तरूण वाहून गेले

Next

बचाव पथकाकडून शोध : दोन तास वाहतूक ठप्पफोटो पी १८ खारतळेगाव

अमरावती/ टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील खारतळेगाव येथील नाल्याला अचानक आलेल्या पुरात दोन स्थानिक तरूण वाहून गेले. रविवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना उघड झाली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची चमू खारतळेगाव येथे पोहोचली असून त्या तरुणांचा युद्धस्तरावर शोध चालविला आहे. भातकुलीच्या तहसीलदारांसह तलाठी, पोलीस पाटील, सरपंच घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

रविवारी दुपारी १ ते २ च्या सुमारास खारतळेेगाव, वायगाव, विर्शी व परिसरात जोरदार पाऊस झाला. त्या दमदार पावसाने खारतळेगावाच्या मधोमध वाहणाऱ्या नाल्याला मोठा पूर आला. पावसामुळे दर्यापूर अमरावती रस्त्यावरील वाहतूक खोळंबली.

पाऊस थांबल्यानंतर गावकर्यांनी पूर पाहण्यासाठी पुलावर गर्दी केली. तेव्हा गावातील प्रवीण रामराव गुडधे (३२) व निरंजन आकारामजी गुडधे (३४) हे नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्यानंतर लगेच रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले. दुपारी ४.३० ते ५ च्या आसपास मदतकार्य सुरू करण्यात आले. गावातील शाळेच्या मागील परिसरापर्यंत शोध घेण्यात आला. मात्र, दोघांपैकी एकही तरुण मिळू शकला नाही. दरम्यान, सायंकाळ झाल्याने शोधकार्यात अडसर निर्माण झाला.

बॉक्स

गावात खळबळ

माहितीनुसार, प्रवीण व निरंजन हे चुलतबंधू असून, ते नजीकच्या धामोरी येथे एका लग्नसमारंभात गेले होते. ते परतताना खारतळेगाव बसथांब्यावर उतरले. तेथून पायदळ येत असताना ते नाल्याच्या पुरात वाहून गेले. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. प्रवीण व निरंजन दोघेही विवाहित आहेत. वृत्त लिहिस्तोवर त्यांचा शोध लागला नव्हता.

Web Title: Flooding of nallah at Khartalegaon; Two young men were carried away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.