जळू नदीला पूर, माऊली चोर परिसरातील शेतीचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:18 AM2021-09-10T04:18:04+5:302021-09-10T04:18:04+5:30

कॅप्शन - पावसामुळे आजूबाजूच्या शेतात असे पाणी पसरले आहे. नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील दाभा आणि धानोरा मंडळात बुधवारी रात्री ...

Floods on Jalu river, severe damage to agriculture in Mauli Chor area | जळू नदीला पूर, माऊली चोर परिसरातील शेतीचे अतोनात नुकसान

जळू नदीला पूर, माऊली चोर परिसरातील शेतीचे अतोनात नुकसान

Next

कॅप्शन - पावसामुळे आजूबाजूच्या शेतात असे पाणी पसरले आहे.

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील दाभा आणि धानोरा मंडळात बुधवारी रात्री कोसळलेल्या ११६ मिमी व ९८.८ मिमी पावसामुळे माहुली चोर येथील जळू नदीला पूर वाहिला.

माहुली चोर येथील जळू नदीला पूर आल्याने पाणी आजूबाजूच्या शेतात शिरून पिकांचे अतोनात नुकसान झाले. जमीन खरडून गेली. शेतातील सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांचे नदीकाठच्या शेतातील पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे माहुली चोर येथील शेतकरी राजेंद्र सरोदे यांनी सांगितले. बुधवारी रात्री आठ वाजता च्या सुमारास जळू नदीला पूर आल्याने पाणी गावात शिरले होते. सुदैवाने काही वेळात पावसाने उसंत घेतल्याने नदीचा पूर ओसरला. माहुली चोर येथील जळू नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने काही काळ अमरावती यवतमाळ मार्गावरील वाहतूकही खोळंबली होती. असे गावकऱ्यांनी सांगितले.

090921\img-20210909-wa0028.jpg

जळू नदीच्या पुराचे पाणी शेतात शिरले.

Web Title: Floods on Jalu river, severe damage to agriculture in Mauli Chor area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.