नवयुगच्या गणरायावर जेसीबीद्वारे पुष्पवर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:14 AM2021-09-22T04:14:45+5:302021-09-22T04:14:45+5:30
फोटो - अंजनगाव सुर्जी २१ पी अंजनगाव सुर्जी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सण, उत्सवांसह गणेशोत्सवावरसुद्धा कोरोनाचे सावट असल्याने नियमांचे ...
फोटो - अंजनगाव सुर्जी २१ पी
अंजनगाव सुर्जी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सण, उत्सवांसह गणेशोत्सवावरसुद्धा कोरोनाचे सावट असल्याने नियमांचे पालन करीत अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात आला. रविवारी शहरातील सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे कुठलाही गाजावाजा ना करता व मिरवणूक न काढता शांततेत विसर्जन पार पडले.
पानअटाई येथील नवयुग गणेश मंडळाच्या गणरायावर विसर्जनासाठी मूर्ती ट्रॅक्टरवर विराजमान होताच जेसीबीच्या साहाय्याने मूर्तीच्या डोक्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. हा प्रसंग वैशिष्ट्यपूर्ण ठरला. मिरवणूक नसल्याने शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांकडून मूर्ती थेट विसर्जन स्थळी नेण्यात आल्या. कोरोनाच्या निर्बंधांचे सावट असले तरी गणेशभक्तांनी नियमांचे पालन करून हा उत्सव जल्लोषात साजरा केला. यात शहरातील ७५ वर्षांची परंपरा असलेल्या पान अटाई येथील नवयुग गणेश मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी ट्रॅक्टरवर ठेवताच येथील कंत्राटदार विजय अस्वार यांनी जेसीबीद्वारे या गणरायावर पुष्पवृष्टी केली. यावेळी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा जल्लोष केला. यावेळी उद्योजक प्रवीण नेमाडे, मंडळाचे अध्यक्ष प्रवीण बोडखे, उपाध्यक्ष अनिल थोरात, सचिव श्याम थोरात, सदस्य सुमीत बोडखे, सागर मुरकुटे, दीपक दाभाडे, कैलास थोरात, रूपेश बोडखे, उमेश थोरात, महेंद्र थोरात, चालक ......... यांची उपस्थिती होती. पोलीस निरीक्षक दीपक वानखडे, सहायक निरीक्षक विशाल पोळकर यांच्या निगराणीत व चोख पोलीस बंदोबस्तात शहरातील गणेशोत्सव शांततेत पार पडला.