पतंग उडवा, पण जपून नायलॉन मांजा नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:01 PM2019-01-13T23:01:33+5:302019-01-13T23:02:43+5:30

प्रतिबंधित नायलॉन मांजाने पतंग उडविणे जीवघेणा ठरू शकते, सोबत संक्रांतीला पतंग जपूनच उडवावी, मांजाच्या स्पर्शाने विद्युत प्रवाहाचा धोका होण्याची शक्यता आहे. यापूर्वी घडलेल्या काही घटनांवरून नाकारता येत आहे.

Fly the kite, but do not waste the nylon manger | पतंग उडवा, पण जपून नायलॉन मांजा नकोच

पतंग उडवा, पण जपून नायलॉन मांजा नकोच

Next
ठळक मुद्देपशुपक्ष्यांसह मानवी जीवाला धोका : संक्रांतीच्या पर्वावर मांजाची खुलेआम विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रतिबंधित नायलॉन मांजाने पतंग उडविणे जीवघेणा ठरू शकते, सोबत संक्रांतीला पतंग जपूनच उडवावी, मांजाच्या स्पर्शाने विद्युत प्रवाहाचा धोका होण्याची शक्यता आहे. यापूर्वी घडलेल्या काही घटनांवरून नाकारता येत आहे. नॉयलॉन मांज्यात अडकून पशुपक्ष्यांचे जीव गेले, अनेक नागरिकांनाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे यंदा संक्रांतीच्या पर्वावर नायलॉन मांज्याचा वापर टाळा, असे आवाहन समाजपे्रेमींनी केले आहे. नॉयलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
सुटीच्या दिवसांत अनेक पतंगीचे शौकीन नायलॉन मांज्याचा वापर करून पतंगी आकाशात उडविताना दिसून येतात. याशिवाय संक्रांतीच्या पर्वावर शहरात मोठ्या प्रमाणात पतंगी उडविल्या जातात. १४ जानेवारी रोजी संक्रांतीच्या पर्वावर पतंग उडावा, पण जपूनच, पतंग उडविताना नॉयलॉनच्या मांजा वापर करूच नका, याशिवाय विद्युत तारेपासून दूरच पतंग उडावा, असा सल्ला निसर्गप्रेमींनी दिला आहे. चायना व नॉयलॉन मांज्याचे घातक परिणाम अनेकांना भोगावे लागल्याच्या घटना मागील काही वर्षांत घडल्या आहेत.
मागील वर्षांत नवाथे परिसरात नायलॉन मांज्या वाहत्या रस्त्यात आला असता, एका हेल्मेटधारक दुचाकीस्वाराच्या मानेत अडकला होता. त्याच मांज्याने इसमाचा गळा चिरला होता. अनेक पशुपक्ष्यांनाही आपले जीव गमावावे लागलेत. पतंग कटल्यानंतर ती वाºयाच्या दिशेने कुठे जाऊन पडेल याच नेम नसतो, तो धागा बारीक असल्यामुळे सहजासहजी दृष्टीस पडत नाही. त्यामुळे अनभिज्ञ असणाऱ्या नागरिकांच्या गळ्यापर्यंत नॉयलॉन धागा पोहोचल्यानंतरच लक्षात येत. मात्र, तोपर्यंत गळा किंवा अन्य अवयव कापला जातो. अशाप्रसंगी वाहनचालकाचे लक्ष विचलित होत मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासाठी शासनाने नॉयलॉन मांज्याच्या उत्पादन, खरेदी- विक्री व वापरावर प्रतिबंध लावला आहे. मात्र, तरीसुद्धा अनेक व्यापारी नॉयलॉन मांज्याचा शहरात छुप्या मार्गाने विक्री करीत असल्याची कुणकुण लागली आहे. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांवर पोलिसांची नजर राहील.
मागील वर्षात तीन लाखांचा मांजा जप्त
मागल्या वर्षी मनपा, पोलीस प्रशासन, वन विभाग, दिशा फाउंडेशन आणि वसा संस्थाच्यावतीने राजकमल चौकात नायलॉन मांज्या विरोधी स्वाक्षरी अभियान घेण्यात आले. या स्वाक्षरी अभियानाला अमरावतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पोलीस विभागाकडून तब्बल ३ लाख रुपयांचा नायलॉन मांज्या बाजारपेठेतून जप्त करण्यात आला होता. अमरावतीच्या इतिहासात पहिल्यांदाच नायलॉन मांज्या विरोधातील या कार्यवाहीला प्रथमच एवढा प्रतिसाद मिळाला. यंदाही पोलीस सजग राहून कारवाई करतील का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हायटेंशन ताराजवळ पतंग उडविणे जीवघेणे
हायटेंशन विद्युत तारेजवळ पतंग उडवू नका, ते जीवघेणा ठरू शकते, असा सल्ला वीज वितरण अभियंत्यांनी दिला आहे. पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा मांजा हा वीजवाहक असू शकतो. मांजा तयार करताना धातूच्या भुकटीचा वापर केला जातो. त्यामुळे धातूमुळे वीज प्रवाहाचा झटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे वीज तारेजवळ पतंग उडवू नका, असे आवाहन वीज वितरण विभागाने केले आहे.
प्लास्टिक पन्नीचाही सर्रास वापर
प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर प्रशासनाने अनेकांवर कारवाईचा बडगा उगारला. मात्र, आता ती कारवाई थंडबस्त्यात आहे. प्लास्टिकचा वापर पतंगीचा मांजा तयार करण्यासाठीही सर्रास वापर केला जातो.

नायलॉन व चायना मांज्याचे घातक परिणाम भोगावे लागतात. शहरात जखमी अथवा नॉयलॉन मांज्यात फसलेल्या पक्षी आढळल्यास आमच्याशी सपर्क साधावा.
- शुभम सायंके, निसर्गप्रेमी

Web Title: Fly the kite, but do not waste the nylon manger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.