आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 09:44 PM2019-02-10T21:44:41+5:302019-02-10T21:45:13+5:30
टेंभ्रुसोडा हे खासदारांनी दत्तक घेतलेले गाव असताना या गावाची अवस्था बकाल झाली आहे. आरोग्य केंद्रात सुविधा नाहीत. कायमस्वरूपी डॉक्टर नाहीत. यासह विविध समस्यांचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. येथील आदिवासी महिलांच्या सक्षमीकरण भर देण्यात येईल, अशी ग्वाही शनिवारी नवनीत राणा यांनी महिला मेळाव्यात दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : टेंभ्रुसोडा हे खासदारांनी दत्तक घेतलेले गाव असताना या गावाची अवस्था बकाल झाली आहे. आरोग्य केंद्रात सुविधा नाहीत. कायमस्वरूपी डॉक्टर नाहीत. यासह विविध समस्यांचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. येथील आदिवासी महिलांच्या सक्षमीकरण भर देण्यात येईल, अशी ग्वाही शनिवारी नवनीत राणा यांनी महिला मेळाव्यात दिली.
आदिवासींचे स्थलांतर थांबविण्याकरिता गावागावांत रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. येथील तंत्रनिकेतन विद्यालयातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यावर भर देण्यात येईल. मुला-मुलींना स्पर्धा परीक्षा देता यावर यासाठी मोफत प्रशिक्षण केंद्र राबविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या. या गावात मोबाईल टॉवरची सुविधा नसल्यामुळे येथील नागरिकांना अडचणी येत आहेत. यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे राणा म्हणाल्या.
गावागावांत गृहउद्योगांची निर्मिती करून आदिवासी महिलांना सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे त्या मेळाव्याप्रसंगी म्हणाल्या. मेळाव्याला उर्मिला दहिकर, कुसूम झरेकर, भुलवंताबाई ताटे, हेमलता झरेकर, कांता ठमके, लिला चतुरकर, पार्वती माहुरे, जितु दुधाने, उपेन बछले, गणेश शिवहरे, सुरेश दहिकर, सुरेश कास्देकर, बाबुलाल ताटे, साहेबराव दहिकर, विनोद दारसिम्बे, सुरेश तोटे, दिनेश बेलसरे, योगेश उके, विलास उंबरकर, चेतन बाळापुरे, गोलू अथोटे, वसंत वाघमारे आदी उपस्थित होते.