सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनेने वेधले सर्वांचे लक्ष
By admin | Published: April 18, 2016 12:07 AM2016-04-18T00:07:28+5:302016-04-18T00:07:28+5:30
विश्र्वव्यापी जगत् कल्याणी सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.
सामाजिक उपक्रम : गुरूदेव सेवा मंडळाचे आयोजन, हजारोंची उपस्थिती
अमरावती : विश्र्वव्यापी जगत् कल्याणी सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. स्थानिक पंचवटी चौकातील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्रांगणात रविवारी सायंकाळी ही सामुदायिक प्रार्थना पार पडली.
श्री गुरूदेव सेवाश्रम ट्रस्ट राधानगर, अमरावती जिल्ह्यातील सर्व गुरूदेव सेवा मंडळ आणि श्री गुरूदेव समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने ही सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. या कार्यक्रमात भजन संध्या, सामुदायिक प्रार्थना, प्रबोधन, व राष्ट्रवंदना घेण्यात आली. सर्वधर्मीय प्रार्थना करून आत्मचिंतन व सामुदायिक नमस्कार तसेच श्री गुरूदेव, सर्व साधू संत व भारत मातेचा जयघोष करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरूण शेळके, तर स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सतीश तराळ तसेच प्रमुख अतिथी म्हणून महापौर चरणजितकौर नंदा, विभागीय आयुक्त ज्ञानेश्र्वर राजूरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त दत्रातय मंडलिक, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम, मनपा आयुक्त चंद्रकात गुडेवार, विजय ठाकरे, निरंजन गाठेकर, रवींद्र ठाकरे, खुशालसिंह परदेशी यांच्यासह अविनाश मोहरील, भदन्त सुमंगल महास्तवे, सुदर्शन जैन, हाफिज मसूद साहाब, झुबीन दोतीवाला, रूपेश डाबरे, सरदार हरबक्खसिंग कुगोवेजा, शरणपालसिंग अरोरा आदी सर्व धर्माचे प्रचारक उपस्थित होते. संत अंबादास महाराज कान्होली, रामधन महाराज दाभा, संत बंडोजी महाराज एकलारा, प्राजपिता ब्रम्हकुमारी, विश्व विद्यालयाच्या सीता दीदी यांचीही उपस्थिती होती. सृष्टीचा निर्माता एकच असून या देशात अनेक संस्कृ ती उदयास आल्यात. याची सुरूवात द्रविड संस्कृतीपासून आर्यसंस्कृती, ग्रिक संस्कृती व अन्य संस्कृती उदयास आल्या आहेत. सर्वधर्माची वेशभूषा, केशभूषा वेगवेगळी असली तरी सर्वांनी एकत्र येऊन सामुदायिक प्रार्थना केली पाहिजे, असा संदेश राष्ट्रसंतांनी सामुदायिक प्रार्थनेतून दिला आहे. राष्ट्रसंतांचे तत्त्व महत्त्वाचे असून आपण सर्व एक आहोत व एका अधिष्ठानात राहिले पाहिजे हा यामागील उद्देश असल्याचे मत आचार्य हरिभाऊ वेरूळकर नांदुरा यांनी व्यक्त केले. यावेळी इतर मान्यवरांनीही विचार मांडलेत. प्रास्ताविक मनोहर साबळे, राष्ट्रवंदना प्रकाश बोके, सामुदायिक प्रार्थना आचार्य हरिभाऊ वेरूळकर यांनी तर मनोगत, हभप भाष्कर विघे गुरूजी, हभप नामदेव महाराज गव्हाळे यांनी केले, तर समारोपीय भाषण हभप लक्ष्मण काळे महाराज यांनी केले. संचालन दिनेश मासोदकर यांनी केले. कार्यक्रमाला सर्वधर्मिय नागरिक व गुरूदेव सेवा मंडळाचे कायक़र्त्याचा सहभाग होतो. मनोज भिष्णूरकर, श्रीधर डहाके, ज्ञानेश्वर वानखडे, संजय तायडे, मधुकर केचे, शंकरराव वसू आदी उपस्थित होते.