लोककलावंत विकताहेत भाजीपाला, सरकारी मदत केवळ नावाला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:17 AM2021-08-14T04:17:03+5:302021-08-14T04:17:03+5:30
कलावंतावर म्हातरपणातही कोरोनामुळे अनेकांवर मजुरीची पाळी अमरावती : बोलीभाषेतून समाजातील प्रश्नांची उकल करण्याचे, अंधश्रद्धा दूर करण्याचे अनमोल असे कार्य ...
कलावंतावर म्हातरपणातही कोरोनामुळे अनेकांवर मजुरीची पाळी
अमरावती : बोलीभाषेतून समाजातील प्रश्नांची उकल करण्याचे, अंधश्रद्धा दूर करण्याचे अनमोल असे कार्य लोककलावंत अनेक पिढ्यांपासून करीत आले आहेत. या लोकलावंतांप्रति उत्तरदायित्व म्हणून सरकार अशा कलावंतांना मदतीचा हात देते. त्यासाठी राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तर अशी वर्गवारी पाडण्यात आली आहे. कलावंतांच्या कलेचा सन्मान म्हणून त्यांना मानधन दिले जाते. हे मानधन तुटपुंजे आहे. असे असले तरी कलावंतांसाठी आजच्या घडीला मोलाचा आधार ठरत आहे.
बॉक्स
मदत हातात किती उरणार ?
कोरोनाने लोककलावंतांचे कार्यक्रम बंद आहेत. परिणामी कलावंत संकटात सापडले आहेत.
पूर्वी ‘क’ वर्गातील लोककलावंतांना १५०० रुपये मानधन मिळत होती. आता २२५० रुपये मिळते.
ही मदत काही मोजक्याच लोकांना हाती पडत आहेत. अनेक कलावंत अद्यापही उपेक्षित आहेत.
बॉक्स
राज्य सरकारची मदत कधी मिळणार?
५० वर्षे पूर्ण करणाऱ्या कलावंतांना मानधन म्हणून २२५० रुपये जाहीर झाले.
ज्यावेळी निधी उपलब्ध होईल, त्यावेळी ही मदत लोककलांच्या खात्यात जमा होईल.
अनेक वेळा ही मदत कलावंतांना वेळेवर मिळत नाही ती केवळ नावालाच असल्याचे बोलले जाते.
बॉक्स
जिल्ह्यात ८६० कलावंतांची यादी
दरवर्षी पालकमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या समिती अध्यक्षांच्या उपस्थितीत कलावंतांची निवड केली जाते.
राष्ट्रीय स्तरावरील कलावंतांना ‘अ’ दर्जा, राज्यस्तरावर ‘ब’ दर्जा , आणि स्थानिक स्तरावर ‘क’ दर्जा असतो.
एका वर्षी केवळ ६० लोकांची निवड होते. या निवडीसाठी २०० ते २५० अर्ज येतात.
बॉक्स
कलावंतांची फरफट
कोट
लोककलावंतांची अवस्था फार वाईट आहे. अनेक जण रोजमजुरी करत आहेत, तर काही महिला कलावंत शेतीच्या कामावर काम करीत आहेत. शासनाकडून उतरत्या वयातही कलावंतांना कुठलीही मदत नाही.आर्थिक आधार नसल्याने उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.
- करुणा कदम, कलावंत
कोट
गत दोन वर्षांपासून हाताला काम नसल्याने शेतीचे काम करावे लागत आहे. अलीकडे रोजमजुरीचे साधन उरलेले नाही. या काळात पर्यायी व्यवसासायाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याशिवाय उदरनिर्वाह होऊ शकत नाही. शासनाने मदतीचा हात देणे गरजेचे आहे.
- सुखदेव जामनिक, कलावंत
कोट
कोरोनामुळे गत दोन वर्षापासून कलावंताचे कार्यक्रम बंद आहे. हाताला काम नसल्याने भाजीपाला विकवा लागत आहे किंवा दुसरे मजुरीचे काम करावे लागत आहे. मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. म्हातारपणात आता कामही करणे होत नाही. त्यामुळे शासनाने कलावंताची जपणूक करून मदत करणे गरजेचे आहे.
- राजाभाऊ हातागडे, कलावंत