लोककलावंत, कलाकार, बॅकस्टेज आर्टिस्ट हवे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:15 AM2021-04-23T04:15:16+5:302021-04-23T04:15:16+5:30
चांदूर बाजार : कोरोनाचा प्रादुर्भावच्या काळात लोककलावंत, कलाकार, बॅकस्टेज आर्टिस्ट यांच्यावर अडचणींचा पहाड कोसळला आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे सादरीकरण ...
चांदूर बाजार : कोरोनाचा प्रादुर्भावच्या काळात लोककलावंत, कलाकार, बॅकस्टेज आर्टिस्ट यांच्यावर अडचणींचा पहाड कोसळला आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे सादरीकरण बंद असल्यामुळे कुठलेच काम नाही. त्यामुळे अशा लोककलावंत, कलाकार, बॅक स्टेज आर्टिस्ट ना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली आहे.
गेल्या दीड वर्षापासून काम बंद, त्यामुळे सततची बेरोजगारी यामुळे राज्यातील लोककलावंत, कलाकार, बॅकस्टेज आर्टिस्टवर उपासमारीची पाळी आली आहे. या कलाकारांनी आतापर्यंत खर्च कसाबसा भागवला. आता कुठे तरी काम सुरू होत असताना पुन्हा कोरोनाचा वाढल्याने लॉकडाउन करण्यात आले. त्याअनुषंगाने शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे राज्य समन्वयक संदीप राक्षे, विदर्भ अध्यक्ष शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान शेखर पाटील यांच्या वतीने सरकारकडे निवेदन करण्यात आले आहे.