गाडगेबाबांच्या विचारांचे आचरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:13 PM2018-01-10T23:13:00+5:302018-01-10T23:13:57+5:30
संत गाडगेबाबा कुण्या एका समाजाचे धरवर नव्हते, तर ते खºया अर्थाने सर्व समाजाचे संत होते. जात समोर आल्यावर समाजाचा विकास खुंटतो म्हणून जातीवर कोणतेही राजकारण नको.
आॅनलाईन लोकमत
अंजनगाव सुर्जी : संत गाडगेबाबा कुण्या एका समाजाचे धरवर नव्हते, तर ते खऱ्या अर्थाने सर्व समाजाचे संत होते. जात समोर आल्यावर समाजाचा विकास खुंटतो म्हणून जातीवर कोणतेही राजकारण नको. धोबी समाजाने फक्त कपड्यांना इस्त्रीपुरता विचार करू नये, तर आपल्या कक्षा विस्तारून जग जिंकण्याची उमेद बाळगावी. या नव्या युगात रोजगार निर्मिती करणारेसुद्धा संतपदाला प्राप्त आहेत, असे मनोगत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
महाराष्टÑ राज्य परीट धोबी सेवा मंडळाच्यावतीने आयोजित गाडगेबाबा पुण्यतिथी व समाज मेळाव्यात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार रमेश बुंदिले, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, भाजपाध्यक्ष मनोहर मुरकुटे, धोबी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देवराव सोनटक्के व आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष अनिल शिंदे, प्रदेशाध्यक्ष अरूणा रायपुरे आदी उपस्थित होते.
धोबी समाजाच्यावतीने विविध मागण्या समाजाच्यावतीने करण्यात आल्या. परीट समाजाचा आरक्षण हा घटनादत्त अधिकार आहे. राज्यपालांद्वारे गठित हांडे समितीने स्पष्ट अहवाल दिल्यानंतरही याबाबत दिरंगाई होत आहे, असा आरोपही करण्यात आला. मागण्यांचा परामर्श घेऊन समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन पोटे यांनी दिले. संचालन कुंदा नायडकर व तेजल नायडकर यांनी केले. कार्यक्रमासाठी सुरेश नायडकर, श्रीकृष्ण पेढेकर, विनोद ठाकरे, रामकृष्ण सेवाने, प्रमोद नारोडकर, सतीश शेवाने आदींनी सहकार्य केले.