अन्नदात्यासाठी किसानपुत्रांचा अन्नत्याग
By admin | Published: March 20, 2017 12:01 AM2017-03-20T00:01:46+5:302017-03-20T00:01:46+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील चीलगव्हाण येथील साहेबराव करपे दाम्पत्याची आत्महत्या ही राज्यातील पहिली जाहीर शेतकरी आत्महत्या ठरली होती.
पंचवटी चौकात आंदोलन : बळीराजाची व्यथा शासनदरबारी पोहोचविण्याचा प्रयत्न
अमरावती : यवतमाळ जिल्ह्यातील चीलगव्हाण येथील साहेबराव करपे दाम्पत्याची आत्महत्या ही राज्यातील पहिली जाहीर शेतकरी आत्महत्या ठरली होती. १९ मार्च १९८६ मध्ये या घटनेला ३१ वर्षे पूर्ण झालीत. राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या स्मृती जपण्यासाठी आणि जगाच्या पोशिंद्याचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी एकदिवसीय ‘अन्नत्याग’ आंदोलन करण्यात आले. पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुखांच्या पुतळ्यासमोर उभारलेल्या मंडपात एक दिवस अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
शासनाने शेतकरी कायद्यात सुधारणा करावी करून जगाच्या पोेशिंद्याला न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून शंभर शेतकरी कुटुंबांसह सर्वपक्षीय नेत्यांनी केली. नैसर्गिक आपत्ती, शासनाची शेतकऱ्यांबद्दलची अनास्था यामुळे आतापर्यंत तब्बल लाखभर शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे. याशेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी एक दिवस उपवास करण्यात आला. पहिल्या जाहीर शेतकरी आत्महत्येला तब्बल ३१ वर्षे लोटली. सत्ताापालटही अनेकदा झाला. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्या अद्यापही कायम आहेत. शासनाला शेतकऱ्यांची कणव येत नाही. त्यामुळेच पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या स्मृती जागवून शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. जगाला अन्न पुरविणाऱ्या अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग करण्याच्या किसानपूत्र आंदोलनाचे जनक अमर हबीब यांच्या संकल्पनेतून रविवारी राज्यभर हे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
याअन्नत्याग आंदोलनात चंद्रकांत मोहिते, हरिभाऊ मोहोड, नितीन पवित्रकार, विजय विल्हेकर, नितीन गुडधे, प्रकाश साबळे, प्रदीप पाटील, नितीन पवित्रकार, विशाल पवार, आकाश वडतकर, सुधीर हरणे, आशिष टेकाडे, अमोल देशमुख, राहुल इंगळे, नितीन धर्माळे, रोशन घोरमाडे संजय ठाकरे, मयुरा देशमुख, सीमा पाटील, संगीता शिंदे, शेखर भोयर, मयूर खोंडे, पुष्पा बोंडे, प्रदीप राऊत, वसंत लुंगे, ओंकार कोल्हे, रूपेश सवाई,
ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती : महेश तराळ, रंजना मामर्डे संजय वानखडे, बंडोपंत भुयार, विठ्ठल वाघ आदी उपस्थित होते. चांदूरबाजारमध्ये १०० शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले. यावेळी नंदकुमार बंड, राजाभाऊ देशमुख, पंकज आवारे, विजय कडू, तुषार देशमुख, अंकित देशमुख, रिद्धेश ठाकरे आदी सहभागी झाले होते. शेतकरी चळवळीचे बाबासाहेब लंगोटे यांच्याहस्ते उपवासाची सांगता करण्यात आली. अंजनगाव सुर्जी तालुक्यातही आत्मक्लेश आंदोलन पार पडले. यावेळी राजेंद्र कोकाटे, प्रेमकुमार बोके, शरद कडू, रमेश काळे, प्रदीप निमकाळे, माणिक मोरे, उमेश काकड, सोपान साबळे, विनोद हागोणे, सुभाष खडसे यांच्यासह शेतकरी संघटनेचे माणिकराव मोरे प्रामुख्याने सहभागी झाले होते. इतर तालुक्यांतही आंदोलन यशस्वीरित्या पार पडले. (प्रतिनिधी)
जिल्हाभरात शेतकऱ्यांचा आत्मक्लेश
किसानपूत्र आंदोलनाचे जनक अमर हबीब यांच्या संकल्पनेतून राज्यभरात करण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनाला जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या जाहीर शेतकरी आत्महत्येनंतर सुरू झालेले शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शासनाला जाग कधी येणार, असा सवाल यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केला.