एसटीचा वाढीव अंतराचा फेरा,दहा रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड भरा

By जितेंद्र दखने | Published: May 9, 2024 06:03 PM2024-05-09T18:03:39+5:302024-05-09T18:04:54+5:30

रस्ता वळविल्याचा फटका : अंजनगाव सुर्जी ते परतवाडा तिकीट महागले

For ST extended distance round, pay an additional fee of Rs.10 | एसटीचा वाढीव अंतराचा फेरा,दहा रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड भरा

For ST extended distance round, pay an additional fee of Rs.10

अमरावती : राष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेमुळे आगामी १२ मेपर्यंत परतवाडा ते अंजनगाव सुर्जी मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. परिणामी या दोन गावांतील तिकीट भाडे १० रुपयांनी महागले असून, हा नाहक भुर्दंड का सहन करावा लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

गत महिनाभराच्या तयारीअंती परतवाडानजीकच्या सावळीत शिवमहापुराण कथा सुरू आहे. ही कथा ऐकण्यासाठी दररोज लाखो नागरिकांची उपस्थिती राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.

महिला, ज्येष्ठांची सवलतही महागली एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक व महिलांना अर्धे तिकीट ही सवलत दिली आहे. परंतु एकूण भाड्यात दहा रुपयांची वाढ झाल्याने त्यांनाही पाच रुपये जास्त द्यावे लागत आहे. त्यामुळे पोलिस विभाग व एसटी महामंडळाने एकत्र निर्णय घेत परतवाडा-अंजनगाव रस्त्यावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविली आहे. त्यामुळे स्वाभाविकच या दोन शहरांमधील नैसर्गिक अंतर वाढले असून, त्याचा भुर्दंड मात्र प्रवाशांकडून वसूल केला जात आहे. हा अन्याय असल्याने धार्मिक कार्यासाठी सामान्यांना वेठीस का धरले जाते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, ग्रामीण पोलिसांनी या मार्गावरील दळणवळण हरम, टवलारमार्गे वळविले आहे. परिणामी एसटी बस व खासगी वाहनांना फेरा घेऊन जावे लागते. या पार्श्वभूमीवर परतवाडा ते अंजनगाव सुर्जीकरिता नेहमीच्या तिकीट दरात दहा रुपये आगाऊ रक्कम प्रवाशांकडून वसूल केल्या जात आहे. प्रवाशांना नेहमीचे तिकीट भाडे माहीत आहे. परतवाड्याहून अंजनगाव सुर्जी येथे जाण्यासाठी ४५ रुपये मोजावे लागतात, हे त्यांनी दोन दिवस आधीपर्यंत अनुभवले आहे. परंतु, दोन दिवसांपासून तिकीट दर १० रुपयांनी वाढविल्यामुळे एसटीच्या वाहकांसोबत त्यांचे वाद होत आहेत. मार्ग बदलविल्यामुळे अतिरिक्त दहा रुपये द्यावे लागत असल्याने प्रवाशांचे आर्थिक बजेटही कोलमडले आहे. दरम्यान, ही नवी डोकेदुखी एसटीच्या वाहकांसाठीही अडचणीची ठरत आहे.

महिला, ज्येष्ठांची सवलत महाग
महिला, ज्येष्ठांची सवलतही महागली. एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक व महिलांना अर्धे तिकीट सवलत दिली आहे. परंतु, एकूण भाड्यात दहा रुपयांची वाढ झाल्याने त्यांनाही पाच रुपये जास्त द्यावे लागत आहेत.

Web Title: For ST extended distance round, pay an additional fee of Rs.10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.