दीड हजारांच्या ओवाळणीसाठी सव्वालाख ‘बहिणीं’चे आले अर्ज

By जितेंद्र दखने | Published: July 16, 2024 08:54 PM2024-07-16T20:54:05+5:302024-07-16T20:54:12+5:30

लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाइनवर अधिक भर, अर्जाचे होणार चावडी वाचन

For the wave of one and a half thousand, applications came from 400,000 'sisters' | दीड हजारांच्या ओवाळणीसाठी सव्वालाख ‘बहिणीं’चे आले अर्ज

दीड हजारांच्या ओवाळणीसाठी सव्वालाख ‘बहिणीं’चे आले अर्ज

अमरावती: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात मंगळवार, १६ जुलैपर्यंत १ लाख २४ हजार ३६७ महिलांनी अर्ज केले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ऑफलाइन पद्धतीने ७३ हजार ७९५ अर्ज, तर ऑनलाइन पद्धतीने ५० हजार ५७२ असे एकूण १ लाख २४ हजार ३६७ अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेमध्ये सध्या ऑफलाइन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. प्रत्येक शनिवारी सर्व नोंद झालेल्या लाभार्थ्यांच्या नावांचे चावडी वाचन करून आक्षेप असल्यास पात्र, अपात्रतेबाबत गाव पातळीवरच खातरजमा करून तालुकास्तरावर समितीने अंतिम मान्यता देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. अर्ज घेण्यासाठी सर्व अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मोहीम स्वरूपात योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिबिराचे आयोजन करण्याबाबत महिला व बालकल्याण विभागाने नियोजन केले आहे. गावातील अथवा त्या त्या वॉर्डमधील सर्व पात्र लाभार्थ्यांचे ऑफलाइन पद्धतीने हार्ड कॉपी अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्यात येत आहेत. अर्जाची नोंद अंगणवाडी स्तरावर घेण्यात येत असून, त्याबाबतच्या नोंदी ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन्ही मिळून आलेले अर्ज नोंदवहीत ठेवण्यात येत आहेत. गावातील प्राप्त झालेल्या सर्व ऑफलाइन अर्जाचे ऑनलाइन स्वरूपात अर्ज भरण्याकरिता ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, तसेच सेतू सुविधा केंद्रातील डाटा ऑपरेटर यांच्यामध्ये वाटप करण्यात येऊन ऑनलाइन फॉर्म भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. वेबवेस्ड ॲप्लिकेशन लिंक तसेच डॅशबोर्डचा ॲक्सेस लवकर प्राप्त झाल्यास कामात सुसूत्रता व अधिक गतिमान कामकाज होणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांच्या मार्गदर्शनात महिला बालकल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ डॉ. कैलास घोडके यांच्या नेतृत्वात कामकाज केले जात आहे.

अमरावती १०२३०, भातकुली ८३८६, अचलपूर ८७४७, अंजनगाव सुजी ५१२२, दर्यापूर ५५२६, चांदुर बाजार ७४५२, मोर्शी ६८८२, वरूड ४८७७, तिवसा ८१८६, चांदूर रेल्वे ५६९७, धामणगाव रेल्वे ५५९६, नांदगाव खंडेश्वर ११३६६, धारणी ९४२५, चिखलदरा ६१५८, अमरावती महापालिका क्षेत्र २०७१७.

Web Title: For the wave of one and a half thousand, applications came from 400,000 'sisters'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.