फॉरेन्सिक लॅबचा अहवाल बिनचूक पुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 10:15 PM2018-03-10T22:15:12+5:302018-03-10T22:15:12+5:30
गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहचविण्यासाठी बिनचूक पुरावा गोळा करून न्यायप्रणालीला पुरविण्यात महत्त्वाची कामगिरी फॉरेन्सिक लॅब बजावते.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहचविण्यासाठी बिनचूक पुरावा गोळा करून न्यायप्रणालीला पुरविण्यात महत्त्वाची कामगिरी फॉरेन्सिक लॅब बजावते. अमरावतीमधील फॉरेन्सिक लॅब बाह्य अंगाने जितकी सर्वांगीण सुंदर व सुसज्ज आहे, तितकीच अंतरंगानेही असावी, अशी अपेक्षा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी व्यक्त केली.
शनिवारी न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या भव्य इमारतीचा दिमाखदार उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. ४५ दिवसांच्या आत सॅम्पलचा अहवाल देण्याचा उद्देश ठेवणारे उपसंचालक विजय ठाकरे यांच्यावर रणजित पाटील यांनी कौतुकांचा वर्षाव करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. या उद्घाटन सोहळ्यात मंचावर न्यायीक व तांत्रिक विभागाचे महासंचालक एस.पी. यादव, गृहविभागाचे मुख्य अप्पर सचीव सुधीर श्रीवास्तव, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, पालकमंत्री प्रविण पोटे, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, खा. आनंदराव अडसूळ, कृष्णा कुळकर्णी, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलीक, आ. सुनील देशमुख, महापौर संजय नरवणे, उपसंचालक विजय ठाकरे उपस्थित होते. राज्यमंत्री रणजित पाटील व पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी फीत कापून प्रयोगशाळेच्या इमारतीचे उद्घाटन केले. मंचावर मान्यवरांचे पुष्पपुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.