चंदन झाडांच्या सुरक्षेत वनविभाग ‘फेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 01:19 AM2018-02-02T01:19:47+5:302018-02-02T01:20:13+5:30
येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि प्रादेशिक उपवनसंक्षक कार्यालय परिसरातील चंदन झाडांच्या सुरक्षिततेसाठी ट्री गार्डसोबत दगड, तारेचे काटेरी कुंपण लावली आहे.मात्र झाडे चोरी गेलीच.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि प्रादेशिक उपवनसंक्षक कार्यालय परिसरातील चंदन झाडांच्या सुरक्षिततेसाठी ट्री गार्डसोबत दगड, तारेचे काटेरी कुंपण लावली आहे.मात्र झाडे चोरी गेलीच. त्यामुळे ज्या यंत्रणेवर वन्यजीव आणि जंगल संरक्षणाची जबाबदारी सोपविली तेच कार्यालय परिसर सुरक्षित ठेवू शकत नाही, मग ते जंगल कसे सुरक्षित ठेवणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
व्याघ्र प्रकल्प व उपवनसंरक्षक असे दोन कार्यालयाचा कारभार येथून चालतो. परिसरात जेमतेम लहानमोठे चार चंदनाची झाडे आहे. यापैकी एक चंदनाचे झाड चोरट्यांनी लंपास केले. हे झाड कुणी नेले, याबाबत कुणीही वाच्यता करीत नाही. मात्र, चंदनाचे झाड चोरीस गेल्याचे बाहेर पडू नये, त्याकरिता झाडाच्या बुंद्याशी ट्री गार्डवर दगड, लोखंडी काटेरी आवरण घातले आहे. त्यामुळे तेथून कोणत्या प्रजातीचे झाड चोरून नेले, हे कदापीही कळणार नाही, अशी शक्कल संबंधित वनाधिकाºयांनी लढविली आहे.
चंदन चोरट्यांसोबत वनकर्मचाऱ्यांचे लागेबांधे
शहरात चंदन चोरटे हे विशिष्ट समुदायातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांंच्यासोबत काही वनकर्मचाऱ्यांचे लागेबांधे असल्याने झाड आकारास आले की, ते अज्ञाताकडून चोरीस जातात, हा आजतागायतचा अनुभव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, डीएफओ, मनपा आयुक्त, आरएफओ, सा.बां. अधीक्षक अभियंता, झेडपी आदींच्या बंगल्यातून चंदन झाडे चोरी गेली आहे
सुरक्षिततेसाठी दोन पहारेकरी आहेत. चंदनाच्या झाडांची चोरी होऊ नये, यासाठी संरक्षण म्हणून ट्री- गार्डसह दगड, लोखंडी काटेरी आवरण करण्यात आले. चोरटे चंदनच्या झाडांच्या बुंद्यावर अटॅक करू नये, हा यामागील उद्देश आहे.
- हेमंत मीणा,
उपवनसंरक्षक, अमरावती