वनविभागाची चिरोडी जंगलात "सर्जिकल स्ट्राइक"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:14 AM2021-09-26T04:14:01+5:302021-09-26T04:14:01+5:30
फोटो - फोटो - पोहरा २५ पी अमोल कोहळे - पोहरा बंदी : वनविभागाच्या जंगलाने सध्या हिरवा शालू ओढला ...
फोटो - फोटो - पोहरा २५ पी
अमोल कोहळे - पोहरा बंदी : वनविभागाच्या जंगलाने सध्या हिरवा शालू ओढला आहे. यातच शासनाच्या ३३ कोटी, १३ कोटी, २ कोटी वृक्षलागवडीच्या ध्येयाची पूर्तता करण्यासाठी या जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. या जंगलाच्या रक्षणाकरिता वनविभागाने चराईबंदी आणि कुऱ्हाड बंदी करण्यात आले आहे. अशातच जंगलावर पाळत ठेवण्यासाठी चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या नेतृत्वातील चमूने २० किमी जंगलात पायी फिरून ‘सर्जिकल स्ट्राइक’ केले.
पावसाळ्यात जंगलातील हिरवेगार वातावरणात अवैध चराईला उधाण येते. त्यामुळे वनविभागाला चराई रोखण्यासाठी चार महिने शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. चिरोडी, माळेगाव, चांदूर रेल्वे या तीनही अतिसंवेदनशील वर्तुळातील जंगलात चांदूर रेल्वे वनविभागाने ‘सर्जिकल स्ट्राइक’चे निर्देश दिले आहेत. वनपाल, वनरक्षक, वनमजूर, संरक्षण मजूर यांच्या सततच्या जंगल गस्तीमुळे छुप्या मार्गाने गुरे चराईला आळा बसला आहे. मेळघाटच्या वनवैभवानंतर जिल्ह्यात चिरोडी ,पोहरा या जंगलाचा समावेश आहे. प्राण्यांसाठी सुपरिचित असणाऱ्या चिरोडी जंगलात दुर्मीळ वन्यप्राण्यांची मालिकाच आहे. येथे गुरे चराईवर नजर ठेवण्यासाठी चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी भानुदास पवार यांनी पायदळ गस्तीची मोहीम हाती घेतली. चांदूर रेल्वे वर्तुळ अधिकारी किशोर धोत्रे, माळेगाव प्रभारी वर्तुळ अधिकारी मयूरी देशमुख, चिरोडी प्रभारी वर्तुळ अधिकारी किशोर धोत्रे, वनरक्षक प्रफुल फरतोडे, राहुल कैकाडे, अतुल धसकट, प्रदीप आखरे, दीपा बेला, संगीता बुंदेले, विशाखा सानप, व्ही.टी. पवार, रजनी भुजाडे, वनमजूर शालिक पवार, शेख रफीक, विनायक लोणारे, रामू तिडके, मंगल जाधव, वाहनचालक संजय पंचभाई हे चिरोडी, माळेगाव, चांदूर रेल्वे वर्तुळातील जंगल धुंडाळत आहेत.