जंगलात वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर वन विभागाची नजर

By admin | Published: October 31, 2015 01:09 AM2015-10-31T01:09:15+5:302015-10-31T01:09:15+5:30

त्या वाघाचे शिकाऱ्यांपासून रक्षण करण्याची दुहेरी जबाबदारी वन विभागाला पार पाडावी लागणार आहे.

Forest department's eye on wildlife hunts in the forest | जंगलात वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर वन विभागाची नजर

जंगलात वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर वन विभागाची नजर

Next

पोहरा-चिरोडी जंगल : वाघामुळे वन कर्मचाऱ्याची जबाबदारी वाढली
अमोल कोहळे पोहरा बंदी
त्या वाघाचे शिकाऱ्यांपासून रक्षण करण्याची दुहेरी जबाबदारी वन विभागाला पार पाडावी लागणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाघाचे अस्तित्व असल्याने पोहरा-चिरोडी जंगलातील वनकर्मचारी या जंगलात शिकाऱ्यावर नजर ठेवून आहे. जंगलात शिकारी शिरू नये यासाठी वनविभाग डोळ्यात तेल घालून पहारा देत असून त्या वाघाला संरक्षण असल्याचे बोलले जाते.
यावर्षी या जंगलात शिकारीच्या घटना कमी झाल्याने काही प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढीस लागली आहे. या जंगलात मोरांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्ह्यातील वने प्राण्यांसाठी सुपरिचित असलेल्या मेळघाट व पोहरा-चिरोडी जंगलात यावर्र्षीे पट्टेदार वाघांचे आगमन झाल्यामुळे पोहरा-चिरोडी जंगलात वनकर्मचाऱ्यांनी मोठी गस्त वाढविली आहे. त्यामुळे शिकाऱ्याचे धाबे दणाणले आहे.
या जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येकाची कसूच चौकशी व तपासणी केली जात आहे. दरम्यान अमरावती वन विभागाचे उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांच्या मार्गदर्शनात दोन्ही वनपरिक्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांची अशी धावाधाव सुरू असून शिकारीला यावर्षी काही प्रमाणात आळा बसला आहे. यावर वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. के. लाकडे, चांदूररेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे यांच्यासह चिरोडी वनपाल सदानंद पाचगे, पोहराचे वनरक्षक मनोज ठाकूर, गारोडे, महाजन, खडसे, नेतनावर, देशमुख, कऱ्हे, नाईक, वनमजूर राजू चव्हाण, शालीक पवार, मंगळ चव्हाण, बाबाराव पळसकर, दीपक नेवार, वानखडे, छोटे, शेख रफीक, शब्बीर शॉह यांनी आपापल्या वनक्षेत्रात समाविष्ट पोहरा, चिरोडी वन क्षेत्रात वन कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गस्त वाढविल्याने शिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: Forest department's eye on wildlife hunts in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.