अंजनगाव वनपरिक्षेत्रात वनरक्षकांसह वनमजुरांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:16 AM2021-09-07T04:16:19+5:302021-09-07T04:16:19+5:30

अतिक्रमणाकडे अक्षम्य दुर्लक्ष, जंगलाची सुरक्षा धोक्यात परतवाडा : अंजनगाव वनपरिक्षेत्रात वनरक्षकांसह वनमजुरांची वानवा आहे. यामुळे जंगलाची सुरक्षा धोक्यात आली ...

Forest laborers along with forest rangers in Anjangaon forest reserve | अंजनगाव वनपरिक्षेत्रात वनरक्षकांसह वनमजुरांची वानवा

अंजनगाव वनपरिक्षेत्रात वनरक्षकांसह वनमजुरांची वानवा

Next

अतिक्रमणाकडे अक्षम्य दुर्लक्ष, जंगलाची सुरक्षा धोक्यात

परतवाडा : अंजनगाव वनपरिक्षेत्रात वनरक्षकांसह वनमजुरांची वानवा आहे. यामुळे जंगलाची सुरक्षा धोक्यात आली आहे. वनरक्षकांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. कर्तव्यावर असलेल्यांकडे अतिरिक्त भार सोपविण्याचा सपाटा वरिष्ठ स्तरावरून सुरू आहे.

वनरक्षकाला जंगलात गस्त घालताना वनमजूर आवश्यक ठरतो. वनरक्षकांकडून वनमजुरांची मागणी वारंवार केली जात आहे. पण, या मागणीकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत आहे. यासाठी खर्चाचा मुद्दा पुढे केला जात आहे. यादरम्यान जंगलाच्या सुरक्षिततेपेक्षा मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या बंगला दुरुस्तीवर, नूतनीकरनावरच अधिक खर्च होत असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

अंजनगाव वनपरिक्षेत्र हे संवेदनशील आहे. यावर लक्ष ठेवण्याकरिता आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग वरिष्ठांकडून दिला जात जात नाही. यामुळे जंगल वाऱ्यावर आहे. अवैध वृक्षतोड आणि अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मनाई असतानाही राजरोस मेंढ्यांची अवैध चराई जंगलात सुरू आहे. या वनपरिक्षेत्रातील अवैध वृक्षतोडीतून गोळा केलेले सागवान लाकूड अंजनगाव, कारला, पणज, अकोट, अकोला येथे वाहनांमध्ये भरून पाठविले जात आहे. अंजनगाव-दर्यापूर मार्गे अमरावती, अकोला, हैदराबादपर्यंत हे लाकूड पोहोचले आहे, याची माहिती वनअधिकाऱ्यांना आहे.ॉ

उपाययोजना नाहीत

काही वर्षांपासून लाकूडतोड राजरोसपणे सुरू आहे. असे असतानाही या अनुषंगाने कुठल्याही ठोस उपाययोजना मेळघाट प्रादेशिक वनविभाग, परतवाडाकडून केल्या जात नाहीत. अवैधरित्या तोडल्या गेलेले सागवान लाकूड गोळा करण्याची निर्धारित ठिकाणे जंगल क्षेत्रातच आहेत. वेळप्रसंगी ते हे लाकूड नाल्यातही गोळा करतात आणि तेथून वन कर्मचाऱ्यांची नजर चुकवून ते ट्रॅक्टर किंवा लहान ट्रकमध्ये भरून लाकूड तस्कर घेऊन जातात.

शेकडो हेक्टरमध्ये अतिक्रमण

अंजनगाव वनपरिक्षेत्रातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणकर्त्यांनी वृक्षतोड करून शेकडो हेक्टरवर अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणाच्या अनुषंगाने वनगुन्हेही दाखल आहेत. अतिक्रमण होऊ नये आणि झालेले अतिक्रमण काढल्या जावे, निरस्त केल्या जावे, याकरिता मेळघाट प्रादेशिक वनविभागात स्वतंत्र असे अतिक्रमण निर्मूलन अधिकारी कार्यरत आहे. तरीसुद्धा अंजनगाव वनपरिक्षेत्रात दर वर्षी अतिक्रमणाच्या घटना घडत असून अतिक्रमण वाढत आहे.

Web Title: Forest laborers along with forest rangers in Anjangaon forest reserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.