नियमबाह्य वनरक्षक पदभरतीत ‘मेडिकल’चा फार्स,  रातआंधळेपणाचा नियम गुंडाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 04:03 PM2018-04-18T16:03:49+5:302018-04-18T16:03:49+5:30

अमरावती येथील मुख्य वनसंरक्षक प्रादेशिकमार्फत सन-२०१७ मध्ये वनरक्षक भरती प्रक्रिया नियमबाह्य राबविल्या गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रातआंधळेपणाचा नियम गुंडाळून वनरक्षकाची नियुक्ती झाल्याप्रकरणी ‘त्या’ वनरक्षकाचे नव्याने मेडिकल तपासणीचे फर्मान सोडले आहे.

Forest Rangers News | नियमबाह्य वनरक्षक पदभरतीत ‘मेडिकल’चा फार्स,  रातआंधळेपणाचा नियम गुंडाळला

नियमबाह्य वनरक्षक पदभरतीत ‘मेडिकल’चा फार्स,  रातआंधळेपणाचा नियम गुंडाळला

Next

अमरावती - येथील मुख्य वनसंरक्षक प्रादेशिकमार्फत सन-२०१७ मध्ये वनरक्षक भरती प्रक्रिया नियमबाह्य राबविल्या गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रातआंधळेपणाचा नियम गुंडाळून वनरक्षकाची नियुक्ती झाल्याप्रकरणी ‘त्या’ वनरक्षकाचे नव्याने मेडिकल तपासणीचे फर्मान सोडले आहे. त्यामुळे वनरक्षक भरतीत मोठा गैरव्यवहार झाल्याच्या चर्चेतून आता काहीअंशी सत्यता बाहेर येऊ लागली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील सहदेव राठोड यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रधान वनसचिव विकास खारगे यांच्याकडे अमरावती प्रादेशिक वनविभागात वनरक्षक भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या आधारे वनमंत्र्यांनी वनरक्षक भरती प्रक्रियेतील वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सहदेव राठोड यांच्या तक्रारीनुसार हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील खांबाळा येथील पंकज यशवंत होडगीर यांनी वनरक्षक सेवाप्रवेश नियमानुसार वैद्यकीय चाचणीतील रातआंधळेपणाचा नियम तोडून वनरक्षकपदी नियुक्ती मिळविली आहे. सध्या ते पश्र्चिम मेळघाट वनविभागातील धूळघाट वनक्षेत्रात बारातांडा येथे वनरक्षकपदी कार्यरत आहे. ३० जून २०११ च्या जीआरनुसार उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांनी २८ फेब्रुवारी २०१७ रोजी वनरक्षक होडगीर यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्र दिले होते. त्यानंतर वैद्यकीय तपासणी अहवालात वनरक्षक पंकज होडगीर हे डोळ्यासंबंधीचा आजार दृष्टीदोष असल्याचे स्पष्ट झाले. परंतु, होडगीर यांची नोकरी जाऊ नये, यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्यांना यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय अधिष्ठाता मंडळाकडे कलर व्हिजन वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले. मात्र, वैद्यकीय अधिष्ठाता मंडळाने वनरक्षक पंकज होडगीर यांच्या त्रातआंधळेपणाचा कुठेही उल्लेख न करता अहवाल जिल्हा सामान्य रूग्णालयाचे शल्य चिकित्सकांना पाठविला. जंगलात प्राणी, विविध प्रकारचे वृक्ष, वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी डोळे शाबूत असणे आवश्यक आहे. परंतु, वनरक्षक होडगीर यांची दृष्टीदोष तपासणी, कलर ब्लार्इंडनेसबाबत अहवाल, प्रमाणपत्र नसताना त्यांची वनरक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती नियमबाह्य असून शासकीय वैद्यकीय अधिष्ठाता मंडळाचा अहवाल प्राप्त नसताना केवळ कागदांचा खेळ करण्यात आल्याचे तक्रारकर्ते सहदेव राठोड यांचा आक्षेप आहे. वनरक्षक भरतीत मोठा आर्थिक व्यवहार झाला असून, यात वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान वनमंत्र्यांकडून यासंदर्भात मुख्य वनसंरक्षकांना चौकशीचे आदेश प्राप्त झाल्यामुळे आता नव्याने वनरक्षक पंकज होडगीर यांची शासकीय यंत्रणेमार्फत वैद्यकीय तपासणी होणार आहे. वनरक्षक भरतीत अन्य उमेदवारांची देखील नियमबाह्य भरती झाल्याप्रकरणी चौकशी होण्याचे संकेत आहेत.

मेडिकल अहवालाकडे लक्ष
वनरक्षक पंकज होडगीर यांची वनविभागाने नव्याने वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वनरक्षक होडगीर यांना मेडिकलबाबत उपवनसंरक्षकांनी पत्रदेखील दिले आहे. त्यामुळे आता यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय अधिष्ठाता मंडळाच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.

‘‘ वनरक्षक पंकज होडगीर यांना पत्राद्वारे नव्याने मेडीकल बोर्डाकडून वैद्यकीय तपासणी करण्याबाबत कळविले आहे. तक्रारीनुसार प्रकरण गंभीर असून, वैद्यकीय अहवालाअंती याप्रकरणी निर्णय घेतला जाईल.
- हेमंत मीणा,
उपवनसंरक्षक, अमरावती

Web Title: Forest Rangers News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.