महाराष्ट्राच्या आराध्यदैवताचा प्रशासनाला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:14 AM2021-02-25T04:14:10+5:302021-02-25T04:14:10+5:30
ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयात कागदावरच जयंती, ग्रामसेवक, तलाठी यांनी मारल्या दांड्या धामणगाव रेल्वे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती ...
ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयात कागदावरच जयंती, ग्रामसेवक, तलाठी यांनी मारल्या दांड्या
धामणगाव रेल्वे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा तालुक्यातील ग्रामपंचायती व तलाठी कार्यालयांना विसर पडला. १९ फेब्रुवारी रोजी या कार्यालयांमध्ये केवळ कागदावरच जयंती साजरी करण्यात आली असल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी राज्य शासन व जिल्हा केली आहे.
राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात पार पडली. कोविड-१९ च्या काळात हा कार्यक्रम कशा पद्धतीने आयोजित करायचा, याबाबतीत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी परिपत्रक काढून सर्व विभागप्रमुखांना सूचना दिल्या होत्या. स्वच्छता अभियानासारखे उपक्रम गावोगावी राबविण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायत व महसूल विभागाला दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महापुरुष जयंतीच्या यादीत असतांना ग्रामपंचायत, शाळा, तलाठी कार्यालयांमध्ये ही जयंती साजरी करण्यात आली नाही. धामणगाव रेल्वे तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक तसेच तलाठी जयंतीला कार्यालयात आलेच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. प्रत्येक गावातील शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांवर आपापल्या मुख्यालयी हजर राहून, कोरोना प्रादुर्भावाच्या काळातील नियमांना अधीन राहून जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्याची जबाबदारी असताना, केवळ कागदोपत्री ही जयंती साजरी करण्यात आली असल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयराव भैसे यांनी जिल्हा परिषद तसेच राज्याच्या ग्रामीण विकास व महसूल खात्याकडे केली आहे. ज्या कार्यालयात ही जयंती साजरी करण्यात आली नाही, त्या संबंधित ग्रामसेवक तथा तलाठी तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी भैसे यांनी आपल्या तक्रारीतून राज्य शासनाकडे केली आहे
मी स्वतः अनेक ग्रा.प. सरपंच- उपसरपंचना फोनद्वारे याबाबत चौकशी केली असता ग्रामपंचायत मध्ये सचिवांची तलाठी कार्यालयात तलाठी व शाळांमध्ये मुख्याध्यापकांची गैरहजेरी होतीमहाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या जयंतीबाबत अशा प्रकारची अनास्था बाळगणाऱ्या
या संबंधितावर कारवाई होणे गरजेचे आहे
विजय भैसे
माजी जी प अध्यक्ष, अमरावती