सुंदर, गोड आवाजातला भुलला खंडणीच्या जाळ्यात अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2022 05:00 AM2022-01-31T05:00:00+5:302022-01-31T05:00:57+5:30

शहर व ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात तशा काही तक्रारी आल्यात. त्या तक्रारींचा सेक्सटॉर्शन होण्यापूर्वीच निपटारा झाल्याने तशा तक्रारीत गुन्हे नोेंदविले गेले नाहीत. अलीकडेच शहर आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात सेक्सटॉर्शनच्या भीतीपोटी एका तरुणाने आकांडतांडव केला होता. त्याचा तो तथाकथित व्हिडीओ डिलिट करण्यासाठी पत्रव्यवहार झाल्याने तो बचावला.

Forget the beautiful, sweet voice and get caught in the trap of ransom | सुंदर, गोड आवाजातला भुलला खंडणीच्या जाळ्यात अडकला

सुंदर, गोड आवाजातला भुलला खंडणीच्या जाळ्यात अडकला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : फेसबूक, व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉलवरून अनोळखी व्यक्तीचा फोन आला, तर तो स्वीकारू नका. व्हिडिओ कॉलवर बोलल्यानंतर वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून दोन्हीकडील व्यक्तींना नग्न असल्याचे भासवून हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जात आहेत.  सुंदर, गोड आवाजाला भुलला; खंडणीच्या जाळ्यात अडकला, अशी काहीसी परिस्थिती येऊन ठेपली आहे.
शहर व ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात तशा काही तक्रारी आल्यात. त्या तक्रारींचा सेक्सटॉर्शन होण्यापूर्वीच निपटारा झाल्याने तशा तक्रारीत गुन्हे नोेंदविले गेले नाहीत. अलीकडेच शहर आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात सेक्सटॉर्शनच्या भीतीपोटी एका तरुणाने आकांडतांडव केला होता. त्याचा तो तथाकथित व्हिडीओ डिलिट करण्यासाठी पत्रव्यवहार झाल्याने तो बचावला.

अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारलेली बरी
फेसबूक अकाउंट सुरू करताना यूजर्सना मोबाइलमधील कॅमेरा, काँटॅक्ट, फोटो, माईक अशा अनेक गोष्टींसाठी परवानगी द्यावी लागते. फेसबूकद्वारे केलेल्या चॅटचा डेटाही त्यांच्याकडे असतो. वैयक्तिक माहितीचा सगळा डेटा फेसबुककडे असताना आता त्यात ‘फ्रेंड रिक्वेस्ट मालवेअर’ची भर पडल्याने सावध राहण्याचा इशारा सायबरतज्ज्ञ देत आहेत. 
अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारलेली बरी, असे सायबरतज्ज्ञ सांगतात. फेसबूक वापरताना फ्रेंड रिक्वेस्ट मालवेअर समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 
यूजर्सना येणाऱ्या नोटिफिकेशन्सवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. कोणतेही ॲप वापरताना फेसबूकद्वारे लॉग इन करणे धोकादायक आहे.

तरूण, वृद्धही अडकले
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुंदर ललनांची छायाचित्रे टाकून आकर्षित केले जाते. त्यात तरुणांसह वृद्धदेखील अडकतात. काही महिन्यांपूर्वी नातवंडं असलेले एक वृद्ध अशाच एका सुंदर, गोड आवाजाला भुलले होते. ते लुबाडलेदेखील गेले. मात्र, केवळ बदनामीच्या भीतीपोटी त्यांनी तक्रार नोंदविली नाही.

एक्सटॉर्शन म्हणजे खंडणी आणि लैंगिकतेचा आधार घेऊन किंवा लैंगिक छळ केल्याचा बनाव करून उकळली जाणारी खंडणी म्हणजे ‘सेक्सटॉर्शन’. एखाद्या व्यक्तीचा फोटो अथवा व्हिडिओमध्ये छेडछाड करून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचे प्रकार वाढले आहेत. ‘न्यूड कॉल्स’च्या माध्यमातून सेक्सटाॅर्शन होत आहे.
    - डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती

राहा सजग, असे टाळा सेक्सटॉर्शन 
समाज माध्यमांवर अनोळखी व्यक्तीसोबत जपून मैत्री करा. अनोळखी व्यक्तीचे ‘व्हिडिओ कॉल’ स्वीकारू नका. अनेकदा तरुणांना फसवण्यासाठी आकर्षक तरुणींच्या चेहऱ्याचा वापर होतो. एखादा ‘न्यूड कॉल’ चुकून स्वीकारला, तर अधिक काळ बोलू नका. लैंगिक छळाचा आरोप, बदनामीची भीती दाखवून पैशाची मागणी होते. खंडणी मागितल्यास आर्थिक व्यवहार करू नका.

 

Web Title: Forget the beautiful, sweet voice and get caught in the trap of ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.