शहर काँग्रेसचे पदवीधर मतदार, शिक्षक, विधी सेलचे गठन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:16 AM2021-09-06T04:16:20+5:302021-09-06T04:16:20+5:30

अमरावती : काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी शहर काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात विविध सेलच्या माध्यमातून ...

Formation of City Congress Graduate Voters, Teachers, Law Cell | शहर काँग्रेसचे पदवीधर मतदार, शिक्षक, विधी सेलचे गठन

शहर काँग्रेसचे पदवीधर मतदार, शिक्षक, विधी सेलचे गठन

Next

अमरावती : काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी शहर काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात विविध सेलच्या माध्यमातून तळागळातील कार्यकर्त्यांना काँग्रेसने न्याय देण्यासाठी भरीव पाऊल उचलले आहे.

शहर काँग्रेसचे कार्यालयात नुकत्याच झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पदवीधर मतदार, शिक्षक, विधी सेलचे गठन करण्याचा निर्ण घेण्यात आला. यावेळी माजी राज्य मंत्री सुनील देशमुख, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले यांच्या उपस्थितीत विविध सेलच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. शिक्षक सेलच्या अध्यक्षपदी प्रदीप शेवतकर, विधी सेलच्या अध्यक्षपदी ॲड. श्रीकांत नागरीकर, पदवीधर मतदार सेलच्या अध्यक्षपदी श्याम प्रजापती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी माजी मंत्री सुनील देशमुख यांनी आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कार्यकर्त्यांनी जनतेशी संपर्क वाढवावा व काँग्रेसची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावे, असा संदेश दिला.

कार्यक्रमाचे संचालन संजय वाघ व सलिम मिरावाले यांनी केले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अपंग विकास सेलचे अध्यक्ष किशोर बोरकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव नंदकिशोर कुईटे, राजू भेले, हमीद शद्दा, ॲड. झिया खान, शम्स परवेज, संजय पमनानी, ॲड. रुपेश सवई, ॲड. समिर पठाण, ॲड. प्रभाकर वानखडे, ॲड. झुबेर अहमद, ॲड. रत्नपाल लांजेवार, नंदकिशोर अंबाडकर, सुरेश यावले, विशाल जाधव, शेख अजीम, अब्दुल रहिम, देविदास उमप, विपुल इंगोले, भूषण इंगळकर, कुणाल यावलीकर, अभिजीत भिवापूरे, यश निस्ताने, आशुतोष पानसरे, शंतनु पवार, अमोल वारे, दत्ता राऊत, राहुल पळसकर व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Formation of City Congress Graduate Voters, Teachers, Law Cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.