माजी विदर्भ प्रांत संघचालक दादारावजी भडके यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 08:35 PM2018-11-03T20:35:47+5:302018-11-03T20:36:03+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विदर्भ प्रांत संघचालक व श्रीमती नरसम्मा हिरय्या शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष दादारावजी वामनराव भडके यांचे शनिवारी सांयकाळी ५.३० वाजता हृदयविकाराने निधन झाले.
अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विदर्भ प्रांत संघचालक व श्रीमती नरसम्मा हिरय्या शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष दादारावजी वामनराव भडके यांचे शनिवारी सांयकाळी ५.३० वाजता हृदयविकाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्यावर रविवारी सकाळी ११ वाजता शहरातील नवसारी भागातील हिंदू स्मशानभूमित अंत्यसंस्कार होणार आहेत.
दादाराव भडके यांना अनेक वर्षांपासून मधुमेह व हृदयविकाराचा त्रास होता. शनिवारी राठीनगरातील त्यांच्या निवासस्थानी नातवाच्या वाढदिवसाची लगबग सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी पद्माताई, मुलगा जयप्रकाश, मुलगी विद्या, भाऊ पुरूषोत्तम व बराच आप्तपरिवार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तालुका संघचालक ते विदर्भ प्रांत संघचालकाची जबाबदारी दादाराव भडके यांनी समर्थपणे सांभाळली.