विद्यार्थ्यांना पोषण आहारात मिळणारा तांदूळ फोर्टिफाईड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 12:44 PM2021-08-07T12:44:20+5:302021-08-07T12:53:21+5:30
Amravati News केंद्र शासनाकडून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून योजनेंतर्गत फोर्टिफाईड तांदूळ प्रथमच पुरवठा केला जात आहे. यातून विद्यार्थ्यांना अधिक पोषकतत्त्वे मिळण्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचे सांगितले. आता जिल्हा परिषदेने सर्व शाळांना पत्र पाठवून याबाबत शंका दूर करत प्लास्टिक तांदूळ असल्याच्या अफवेला विराम दिला.
सूरज दाहाट
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: पंचायत समिती अंतर्गत धानोरा कोकाटे येथील जिल्हा परिषद शाळेत प्लास्टिकचा आरोप पालकांनी केला होता. त्यामुळे सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी लोकमतने यावर ते तांदूळ प्लास्टिकयुक्त नसून विद्यार्थ्यांना पोषक असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. अखेर या वृत्तावर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी शिक्कामोर्तब करीत याबाबत स्पष्टीकरण देत सर्वांचा संभ्रम दूर करीत पत्र जारी केले.
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा तांदूळ बोगस व प्लास्टिकचा तांदूळ मिळत असल्याचा आरोप पालकांनी करत तो तांदूळ घेतला नव्हता, तर याची गंभीर दखल पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेचा शालेय पोषण आहाराचे पथकाने पाहणी करत ते तांदूळ मुलांमधील लोह, प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी असल्याने केंद्र शासनाकडून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून योजनेंतर्गत फोर्टिफाईड तांदूळ प्रथमच पुरवठा केला जात आहे. यातून विद्यार्थ्यांना अधिक पोषकतत्त्वे मिळण्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचे सांगितले. आता जिल्हा परिषदेने सर्व शाळांना पत्र पाठवून याबाबत शंका दूर करत प्लास्टिक तांदूळ असल्याच्या अफवेला विराम दिला.