दाहकतेची चाळीशी कायमच, जीवाची काहिली

By admin | Published: April 10, 2017 12:13 AM2017-04-10T00:13:47+5:302017-04-10T00:13:47+5:30

मागील आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. अंगाची काहिली काहिली होत आहे.

Fortunately for 40 hours, the life of life | दाहकतेची चाळीशी कायमच, जीवाची काहिली

दाहकतेची चाळीशी कायमच, जीवाची काहिली

Next


अमरावती : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. अंगाची काहिली काहिली होत आहे. शहराचे मार्च महिन्यात तापमान ४४ अंश सेल्सियसच्या पुढे गेल्याने मानवासह अन्य प्राणीमात्रांच्या जीवाची लाही-लाही होत आहे. दुपारच्या वेळी उन्हामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येतो. तूर्तास अमरावतीकर ‘एप्रिल हॉट’ चा अनुभव घेत आहेत. शनिवारी, रविवारी तापमान ४२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते.
उन्हाची वेळ टाळावी
अमरावती : सकाळी ९ वाजता उन्हाची दाहकता जाणवू लागते. त्यामुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. वाढत्या उन्हामुळे गॉगल्स, रूमाल, स्कार्फ, दुपट्टे यांसह फ्रीज, कुलर, वातानुकुलित यंत्रांना मागणी वाढली आहे. रात्रीच्या वेळीही उकाड्याची धग जाणवत राहते, हे विशेष. (प्रतिनिधी)

उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या दक्षता
तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या, सौम्य रंगाचे सैल आणि कॉटनचे कपडे वापरा, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी वापरा, प्रवास करताना सोबत पाणी घ्या, घर थंड ठेवा, पडदे, झडपा, सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा, डोळे, गळा, चेहऱ्यासाठी ओल्या कपड्याचा वापर करा, ओआरएस, घरची लस्सी, लिंबूपाणी, सावलीत ठेवा, थंड पाण्याने आंघोळ करा.

Web Title: Fortunately for 40 hours, the life of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.