अचलपूरसह परतवाडावासीयांना दिलासा, संचारबंदीतून साडेचार तासांची मिळाली सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 11:55 AM2022-04-20T11:55:41+5:302022-04-20T12:00:05+5:30

परतवाडा अचलपूर शहरासह लगतच्या कांडली देवमाळी भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता संचारबंदी लागू केली होती, मंगळवारी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत दोन तासांची सूट देण्यात आली.

four and a half hours of consolation to Achalpur-Paratwada residents on the third day of curfew | अचलपूरसह परतवाडावासीयांना दिलासा, संचारबंदीतून साडेचार तासांची मिळाली सूट

अचलपूरसह परतवाडावासीयांना दिलासा, संचारबंदीतून साडेचार तासांची मिळाली सूट

googlenewsNext
ठळक मुद्देभाजप शहराध्यक्षाला पुण्यातून घेतले ताब्यात

परतवाडा (अमरावती) : अचलपूर शहरातील दुल्हा गेटवर पुरातत्त्व विभागाची कुठलीच परवानगी न घेता जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने झेंडा लावल्याप्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष अभय माथने यांना पोलिसांनी पिंपरी-चिंचवड येथून सोमवारी ताब्यात घेतले. मंगळवारी त्यांना सायंकाळी शहरात आणण्यात आले. आरोपीची शोधमोहीम सुरू असून दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत दोन तासांची संचारबंदीत सूट देण्यात आली होती. त्याकाळात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी नागरिकांनी केली.

अचलपूर शहरातील दुल्हागेटवर झेंडा लावण्याच्या वादातून दोन गटांत जातीय तणाव वाढला होता. रविवारी सायंकाळी ७ वाजतापासून सुरू असलेला हा वाद मध्यरात्री दगडफेक वाहनांची तोडफोड आदी नुकसानीपर्यंत पोहोचला. दगडफेकीत पोलीस कर्मचारीसुद्धा जखमी झाले. अश्रुधुराच्या नळकांड्या जमाव पांगवण्यासाठी फोडण्यात आल्या दोन्ही गटांतील चोवीस आरोपींना अटक करण्यात आली. शहरात सर्वत्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त मंगळवारी तिसऱ्या दिवशी कायम आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी तळ ठोकून आहेत.

दोन तासांची सूट

रविवारी मध्यरात्रीपासून अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी परतवाडा अचलपूर शहरासह लगतच्या कांडली देवमाळी भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता संचारबंदी लागू केली होती, मंगळवारी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत दोन तासांची सूट देण्यात आली. या दरम्यान शहरातील काही नागरिकांनी आवश्यक सामानाची खरेदी केली.

पोलिसांचा बंदोबस्त कायम

शहरात कुठल्याही कारणावरून पुन्हा जातीय तेढ किंवा दंगल घडू नये यासाठी सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे, दंगा नियंत्रण पथक सीआरपीएफचे जवान स्थानीय पोलीस लक्ष ठेवून आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी डेरे दाखल आहे.

नवनीत राणा यांचा आज दौरा

पोलीस प्रशासनाने केलेल्या विनंतीनुसार खासदार नवनीत रवी राणा यांचा मंगळवारचा अचलपूर-परतवाडा दौरा एक दिवस पुढे करण्यात आला व बुधवारी आता तो होणार आहे. दुपारी ३ वाजता अचलपूर पोहोचणार असून स्थानिक पोलीस ठाण्याला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेणार आहे.

आतापर्यंत घटनेतील २४ आरोपींना अटक केली असून, अभय माथने यांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.

- शशिकांत सातव, प्रभारी पोलीस अधीक्षक, जिल्हा ग्रामीण, अमरावती ग्रामीण

Web Title: four and a half hours of consolation to Achalpur-Paratwada residents on the third day of curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.