साडेचार लाख रक्त नमुने तपासले, मलेरियाचे ४२ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 01:38 PM2024-04-25T13:38:40+5:302024-04-25T13:45:21+5:30
Amravati : मृत्यूसंख्या घटली; मलेरियाच्या नायनाटसाठी यंत्रणा सतर्क
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात २०२३ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये ४ लाख ७४ हजार ४२६ रुग्णांचे रक्तनमुने तपासल्यानंतर ४२ रुग्णांचे अहवाल हे हिवताप (मलेरिया) दूषित आढळून आले. २५ एप्रिल या जागतिक हिवताप दिनानिमित्त आरोग्य विभागाच्यावतीने २०१९ ही आकडेवारी देण्यात आली आहे. 'जगाच्या संरक्षणासाठी गतिमान २०२१ करूया लढा मलेरियाला हरविण्यासाठी' असे यावर्षीचे २०२३ ब्रीदवाक्य जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केले आहे. मलेरियाचा नायनाट करण्यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध उपाययोजनाही राबविण्यात येत आहेत. हिवताप हा प्लाझमोडियम या परजिवीपासून होतो. जगात दरवर्षी ३०० ते ५०० दशलक्ष लोकांना हिवताप होतो. या आजारामध्ये थंडी वाजून ताप येणे, घाम येऊन अंग गार पडणे, सतत ताप येणे किंवा एकदिवसाआड ताप येणे, डोके दुखणे, उलट्या होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. तर मेंदूच्या हिवतापामध्ये तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, मान ताठ होणे, झटके येणे, बेशुद्ध होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे हिवताप टाळण्यासाठी नागरिकांना आवश्यक उपाययोजना राबविण्याचे आवाहन सीएस डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे, तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी यांनी केले आहे.
असा होतो हिवतापाचा प्रसार
हिवतापाचा प्रसार अॅनिफिलीस जातीच्या मादी डासामार्फत होतो. या डासाची उत्पत्ती ही स्वच्छ साठून राहिलेल्या पाण्यामध्ये होते. डास हिवताप रुग्णास चावल्यास रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासाच्या पोटात जातात. तेथे वाढ होऊन ते जंतू डासाच्या लाळेवाटे निरोगी मन्युष्याच्या शरीरात जातात.
जिल्ह्यातील सहा वर्षांची आकडेवारी
वर्ष तपासलेले रक्तनमुने दुषित रक्तनमुने
२०१९ ४५१७६६ ३१
२०२० ४५५१९४ १३
२०२१ ३१७१६४ २८
२०२२ ४००७५७ ६०
२०२३ ४७४४२६ ४२
प्रतिबंधात्मक उपाययोजना
पाणी साठविण्याचे भांडे घट्ट झाकून ठेवा, आठवड्यातून एकदा सर्व पाणीसाठे आतून घासून- पुसून स्वच्छ ठेवावेत. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवावा. घराच्या परिसरातील डबकी बुजवा, खिडक्यांना जाळ्या बसवा.